किंग विराट कोहलीच्या दमदार धावा, चिकन बिर्याणीच्या प्लेटच्या प्लेट फस्त

मुझफ्फरनगरमधील प्रसिद्ध अशा 'हाजी मकबूल की तेहरी' या दुकानाचे मालक मोहम्मद दानिश रिझवान हे विराट कोहलीचे प्रचंड मोठे चाहते आहेत. विश्वचषक दरम्यान दानिश यांनी आपल्या दुकानात एक खास ऑफर चालवली.

किंग विराट कोहलीच्या दमदार धावा, चिकन बिर्याणीच्या प्लेटच्या प्लेट फस्त
VIRAT KOHLIImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Nov 15, 2023 | 9:18 PM

मुजफ्फरनगर | 15 नोव्हेंबर 2023 : विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात आपले अर्धशतक म्हणजे 50 वे शतक झळकावले. किंग कोहलीने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर एकूण 117 धावांची इनिंग खेळली. मात्र, त्याच्या या धावांमुळे प्रसिध्द अशा चिकन बिर्याणीवर लोक अक्षरशः तुटून पडले. याचे कारण म्हणजे त्या दुकानदाराने दिलेली घसघसीत सवलत. विशेष म्हणजे दुकारादाराने जेव्हा सवलत जाहीर केली. त्याचवेळी 450 हून अधिक ग्राहकांनी बिर्याणीसाठी आधीच नोंदणी केली होती. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये बिर्याणी विक्रेत्याला त्यामुळे मोठा फटका सहन करावा लागला.

मुझफ्फरनगरमधील प्रसिद्ध अशा ‘हाजी मकबूल की तेहरी’ या दुकानाचे मालक मोहम्मद दानिश रिझवान हे विराट कोहलीचे प्रचंड मोठे चाहते आहेत. विश्वचषक दरम्यान दानिश यांनी आपल्या दुकानात एक खास ऑफर चालवली. किंग कोहली जितक्या धावा करेल तितक्या टक्के रकमेची सुट चिकन दम बिर्याणीमध्ये दिली जाईल, अशी त्यांनी घोषणा केली होती. थोडक्यात विराट कोहलीच्या जितक्या धावा, तितकी सूट.

मुझफ्फरनगरमध्ये मोहम्मद दानिश यांनी केलेल्या या घोषणेची एकच चर्चा सुरु होती. त्यामुळे या सवलतीचा लाभ घेण्यासाठी साडे चारशेहून अधिक ग्राहकांनी आपले नाव सवलतीसाठी नोंदवले होते. भारत – श्रीलंका दरम्यान झालेल्या सामन्यात विराट कोहली याने 88 धावांची खेळी केली. त्यामुळे खूश झालेल्या दुकान मालक मोहम्मद दानिश यांनी 60 रुपये किंमतीची चिकन बिर्याणीची प्लेट अवघ्या 7 रुपयांना विकली. बिर्याणीच्या किमतीमध्ये 88% सूट ग्राहकांना देत मालक मोहम्मद दानिश यांनी आपले वचन पूर्ण केले.

मुंबईत वानखेडे स्टेडियमवर विराट कोहली याने न्यूझीलंड संघाविरुद्ध पहिल्या डावात 117 धावांची खेळी खेळली. इकडे विराट कोहली धावांचा डोंगर रचत होता. तर, दुसरीकडे मोहम्मद दानिश यांच्या दुकानात बिर्याणीच्या प्लेटच्या प्लेट संपत होत्या. या सामन्यात विराट कोहली याने 113 चेंडूत 117 धावांची दमदार खेळी केली. यात 9 चौकार आणि 2 षटकार यांचा समावेश होता. कोहली याच्या प्रत्येक धावागनिक बिर्याणीच्या दुकानात ग्राहकांची गर्दी होत होती.

विराट कोहली याची खेळी 117 धावावर थांबली आणि दानिश यांनी जाहीर केल्याप्रमाणे बिर्याणीच्या रकमेत चक्क 117 टक्के इतकी सूट दिली. बर्‍याच ग्राहकांनी त्यांच्या या अनोख्या ऑफरचा लाभ घेतला. उरलेले काही नंतर येऊन या सवलतीचा लाब घेऊ शकतील असे मालक दानिश यांनी सांगितले. या विश्वचषकातील कोणत्याही संघासोबत भारताचा सामना लाइव्ह असेल तेव्हा आमची ऑफर सुरूच राहील. विराट कोहलीने द्विशतक झळकावे आणि आम्हाला प्रत्येकी दोन प्लेट खायला द्याव्यात. कारण, आम्ही त्याचे मोठे चाहते आहोत असेही ते म्हणाले.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.