LPL | श्रीलंकेला IPL चा फटका, लंका प्रीमियर लीग पुन्हा पुढे ढकलण्याची वेळ

लंका प्रीमियर लीगची सुरुवात 14 नोव्हेंबरपासून होणं अपेक्षित होतं. (Lanka Premier League postponed)

LPL | श्रीलंकेला IPL चा फटका, लंका प्रीमियर लीग पुन्हा पुढे ढकलण्याची वेळ
Follow us
| Updated on: Sep 30, 2020 | 5:23 PM

कोलंबो : श्रीलंका क्रिकेट बोर्डाने लंका प्रीमियर लीगच्या (LPL) पहिल्या पर्वाच्या आयोजनात पुन्हा एकदा बदल केला आहे. श्रीलंकेला आयपीएल स्पर्धेमुळे मोठा फटका बसला आहे. एलपीएल स्पर्धा चक्क दुसऱ्यांदा पुढे ढकलावी लागली आहे. लंका प्रीमियर लीगची सुरुवात 14 नोव्हेंबरपासून होणं अपेक्षित होतं. मात्र आता या स्पर्धेला 21 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या 13 व्या (IPL 2020) मोसमातील अंतिम सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे आयपीएल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Lanka Premier League postponed)

“आयपीएलच्या 13 व्या पर्वातील अंतिम सामना 10 नोव्हेंबरला पार पडणार आहे. यामुळे आम्ही लंका प्रीमियर लीग 21 नोव्हेंबरपासून खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आयपीएल स्पर्धेत सहभागी श्रीलंकेच्या खेळांडूना श्रीलंकेत परतल्यावर क्वारंटाईन होण्यासाठी आवश्यक तेवढा कालावधी मिळेल” असं लंका प्रीमियर स्पर्धेचे डायरेक्टर रविन विक्रमरत्ने म्हणाले.

आयपीएल स्पर्धेत विविध देशातील अनेक खेळाडू सहभागी होतात. त्यामुळे आयपीएल स्पर्धा पूर्ण झाल्यानंतर विविध देशातील खेळाडू मोकळे होतील. तसेच त्यांना एलपीएल लीगसाठी खेळता येईल. श्रीलंकेत आल्यानंतर त्यांना आवश्यक क्वारंटाईन कालावधीही पूर्ण करता येईल, या विचाराने हा निर्णय घेतला आहे. एलपीएलच्या या स्पर्धेत श्रीलंका क्रिकेट बोर्डाने प्रत्येक संघात कमाल 6 विदेशी खेळाडू निवडण्याची परवानगी दिली आहे. तर अंतिम 11 खेळाडूंमध्ये 4 विदेशी खेळाडूंना खेळवता येणार आहे.

स्पर्धेच्या आयोजनात दुसऱ्यांदा बदल

लंका प्रीमियर लीगच्या आयोजनात बदल करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी 28 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या स्पर्धेचं आयोजन पुढं ढकलण्यात आलं. दुसऱ्यांदा 14 नोव्हेंबरपासून या स्पर्धेची सुरुवात केली जाणार होती. मात्र आयपीएल स्पर्धेच्या दृष्टीकोनातून पुन्हा या निर्णयात बदल केले गेले. त्यामुळे आता 14 ऐवजी 21 नोव्हेंबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

5 संघ आमनेसामने भिडणार

लंका प्रीमियर स्पर्धेत एकूण 5 संघामध्ये खेळली जाणार आहे. कोलंबो, कॅंडी, गॉल, दाम्बुला आणि जाफना 5 जिल्ह्यांच्या नावावरुन 5 संघांचे नाव ठेवण्यात येणार आहे. ही स्पर्धा एकूण 15 दिवस चालणार आहे. श्रीलंकेतील एकूण 4 आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सामने पार पडणार आहेत. आर प्रेमदासा आंतराराष्ट्रीय स्टेडियम कोलंबो, रनगिरी दांबूला आंतराराष्ट्रीय स्टेडियम, पल्लेकेल आंतराराष्ट्रीय स्टेडियम आणि सूर्यावेवा महिंदा राजपक्षे क्रिकेट स्टेडियम या 4 मैदानात एकूण 23 सामने खेळण्यात येणार आहेत.

दरम्यान कोरोना विषाणूचा फटका क्रीडा क्षेत्राला बसला आहे. आयपीएलच्या 13 व्या स्पर्धेचं मार्च ते मे या दरम्यान आयोजन केलं होतं. मात्र यंदा कोरोना परिस्थितीमुळे आयपीएल स्पर्धा यूएईमध्ये खेळवण्यात येत आहे. तसेच टी-20 वर्ल्ड कप स्पर्धाही पुढे ढकलण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

Sanju Samson : “संजू सॅमसनला संधी मिळाली असती, तर त्याने 2019 चा वर्ल्ड कप जिंकून दिला असता”

धोनीचा ‘वर्ल्डकप विनिंग’ सिक्सर झेलणारा क्रिकेट रसिक सापडला, गावस्करांमुळे नऊ वर्षांनी शोध

(Lanka Premier League postponed)

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.