पाकिस्तानी खेळाडूंनाही IPL खेळू द्या; वसीम अक्रमची मागणी

अनेक अडचणींवर मात करत बीसीसीआयने यंदाची आयपीएल स्पर्धा भरवली आहे. यूएईमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत खूप मोठी चूरस पाहायला मिळत आहे.

पाकिस्तानी खेळाडूंनाही IPL खेळू द्या; वसीम अक्रमची मागणी
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 12:18 PM

इस्लामाबाद : अनेक अडचणींवर मात करत बीसीसीआयने (BCCI) यंदाची आयपीएल (Indian Premier League) स्पर्धा भरवली आहे. यूएईमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत खूप मोठी चूरस पाहायला मिळत आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेट चाहते आयपीएलचा आनंद लुटत आहेत. दरम्यान, आयपीएलच्या पहिल्या सीजनननंतर कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूला ही स्पर्धा खेळता आलेली नाही. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंनाही आयपीएलमध्ये खेळू द्या, अशी मागणी पाकिस्तानी संघाचा माजी कर्णधार वसीम अक्रम (Wasim Akram) याने केली आहे. (Let Pakistani players play in IPL too : Wasim Akram)

वसीम अक्रमचं म्हणणं आहे की, “आयपीएल खेळता येत नसल्यामुळे पाकिस्तानी खेळाडूंचं मोठं नुकसान होत आहे”. 2008 मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध बिघडले. तेव्हापासून पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमधून बॅन करण्यात आलं आहे.

वसीम अक्रम याबाबत म्हणाला की, ”मला असं वाटतं की, आयपीएलला राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे. राजकारण हा दोन्ही देशांच्या सरकारचा मुद्दा आहे. त्यांच्यामुळे दोन्ही देशातील खेळाडू क्रिकेट खेळू शकत नाहीत. आयपीएल ही सर्वात यशस्वी क्रिकेट लीग आहे. मला या स्पर्धेत पाकिस्तानी खेळाडूंना खेळताना पाहायचं आहे.

वसीम अक्रम एवढ्यावरच थांबला नाही, तो पुढे म्हणाला की, मला भारतीय खेळाडूंना पाकिस्तान सुपर लीगमध्येदेखील पाहायचं आहे. जर भारतीय खेळाडू पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळू लागले तर अजून मजा येईल.

आयपीएलमध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या देशांमधील अनेक खेळाडू सहभागी होतात. आयपीएलमधील कामगिरीच्या जोरावर या देशांमधील अनेक खेळाडूंची त्या देशांच्या राष्ट्रीय संघात निवड झाली आहे. मागील वर्षी आयपीएलमध्ये जोफ्रा आर्चरने उत्कृष्ट कामगिरी केली होती. त्यामुळेच त्याला विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली.

संबंधित बातम्या

Women’s T20 Challenge | बुधवारपासून रंगणार महिला आयपीएलचा थरार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

India Tour Australia | ‘हिटमॅन’ रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही? सौरभ गांगुली म्हणतो…

IPL 2020, SRH vs MI : संदीप शर्माची चमकदार कामगिरी, झहीर खानचा रेकॉर्ड मोडित

(Let Pakistani players play in IPL too : Wasim Akram)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.