कुस्तीचा आखाडा गाजवणारा पैलवान विजय चौधरी लोकसभा लढवणार, पक्ष आणि मतदारसंघ…

lok sabha election and maharashtra kesari vijay chaudhari | विजय चौधरी यांची २०१७ मध्ये राज्य सरकारकडून पोलीस उपअधिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते पुणे पोलीस दलात कार्यरत आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी पैलवान विजय चौधरी कुस्तीच्या आखाड्यानंतर आता राजकारणाचा आखाड्यात उतरत आहे.

कुस्तीचा आखाडा गाजवणारा पैलवान विजय चौधरी लोकसभा लढवणार, पक्ष आणि मतदारसंघ...
vijay chaudhariImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 30, 2023 | 12:49 PM

योगेश बोरसे, पुणे, दि. 30 नोव्हेंबर 2023 | कुस्तीच्या आखाड्यात अनेकांना चितपट करणारा पैलवान विजय चौधरी यांनी निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची तयारी सुरु केली आहे. ट्रिपल महाराष्ट्र केसरी असलेला पैलवान विजय चौधरी यांनी आपली राजकीय महत्वकांक्षा जाहीर केली आहे. कुस्तीच्या आखाड्यानंतर आपण राजकारणाचा आखाडा गाजवण्याच्या तयारीत असल्याचे विजय चौधरी यांनी ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना सांगितले. पैलवान विजय चौधरी यांनी आपण राजकारणात एन्ट्री करणार असल्याचे सांगताच चर्चा सुरु झाली आहे.

विजय चौधरी यांना कोणी दिली ऑफर?

विजय चौधरी यांना राजकारणात कोणत्या पक्षाकडून ऑफर आली आहे का? यावर बोलताना सांगितले की, अद्याप कुठल्याच पक्षाची आपणास ऑफर नाही. मात्र भारतीय जनता पक्ष आपला आवडता पक्ष आहे. त्या पक्षाकडून संधी मिळाल्यास आपण लोकसभा निवडणूक लढण्यास तयार आहे.

कोणता मतदार संघ निवडणार

विजय चौधरी हे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील रहिवाशी आहेत. चाळीसगाव तालुक्यातील सायगाव हे त्यांचे गाव आहे. यामुळे जळगाव लोकसभा मतदारसंघात जर संधी मिळाली तर नक्कीच निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जळगाव लोकसभेत सध्या भाजपचे उन्मेष पाटील खासदार आहेत. भाजप उन्मेष पाटील यांना पर्याय शोधत असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. यामुळे विजय चौधरी जळगाव लोकसभा मतदार संघातून लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हे सुद्धा वाचा

विजय चौधरी पोलीस खात्यात

विजय चौधरी यांची २०१७ मध्ये राज्य सरकारकडून पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. सध्या ते पुणे पोलीस दलात कार्यरत आहे. वाहतूक शाखेचे उपअधीक्षक म्हणून ते कार्यरत आहे. आतापर्यंत आपण पोलीस खात्यात राहून जनतेची सेवा केली, आता राजकारणात येऊन जनतेची सेवा करायची आहे, असे विजय चौधरी यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना सांगितले. जळगाव लोकसभा मतदार संघात प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती. परंतु निका कोणत्या पक्षाकडून लढवणार? हे अजून समोर आले नाही.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.