AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mike Tyson ची सटकली! भर विमानात प्रवाशाच्या तोंडावर एकामागोमाग एक दे दणादण मुक्के, व्हिडीओ व्हायरल

Mike Tyson : 55 वर्षांचा माईक टायसन आपल्या रागासाठीच ओळखला जातो.

Mike Tyson ची सटकली! भर विमानात प्रवाशाच्या तोंडावर एकामागोमाग एक दे दणादण मुक्के, व्हिडीओ व्हायरल
जेव्हा माईक टायसनला राग येतो..Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 22, 2022 | 11:02 AM
Share

माईक टायसन (Mike Tyson). अमेरिकेतला माजी बॉक्सर (Americal Boxer). बॉक्सिंगसाठी ओळखल्या जाणाऱ्या माईकचं वय झालंय. पण त्याचं बॉक्सिंग अजूनही जिवंत आहे. भरविमानात एका प्रवाशाला माईक टायसनने बदड बदड बदडलंय. या प्रवाशाच्या तोंडावर दे दणादण मुक्के माईक टायसन मारत होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओही वायरल (Video Viral) झाला आहे. ही घटना 20 एप्रिलची असल्याचं सांगितलं जातंय. विमान प्रवासावेळी एक प्रवाशी माईक टायसनसोबत बोलण्याचा प्रयत्न करत होता. विमानात जिथं माईक टायसन बसलेला, त्याच्या पुढच्या बाजूलाच बसलेल्या प्रवाशाला माईक टायसननं मारहाण केली. पुढे बसलेला हा प्रवासी सारखा माईक टायसनशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. मात्र माईक टायसनला बोलण्याची जराही इच्छा नव्हती. तो बराच वेळ दुर्लक्ष करत होता. त्यानंतर माईकला राग येऊ लागला. आलेला राग मनात धरुन माईक तरिही जागेवरच बसून होता. मात्र प्रवाशाचं बोलणं काही थांबेना!

अखेर माईक टायसनची सटकली आणि त्यानं थेट विमानातील प्रवाशाला दणादण मुक्के तोंडावरच ठेवून दिले. विमानातील दुसऱ्या एका प्रवाशानं या घटनेचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात रेकॉर्ड़ केलाय. य या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर तो बघता बघता व्हायरलही झालाय.

55 वर्षांचा माईक टायसन आपल्या रागासाठीच ओळखला जातो. अनेकदा त्याचा राग अनावर झाल्याचं लोकांनी पाहिलेलं आहेच. पण आता तर माईक टायसननं बॉक्सिंग सोडल्यानंतर विमान प्रवासावेळी एक प्रवाशाला प्रचंड बदडलंय. राग अनावर झाल्यानंतर त्यांनी या प्रवाशाला मारहाण केली.

माईक टायसन जेटब्लू विमानानं प्रवास करत होते. सेंट फ्रान्सिस्कोहून माईक टायसन हे फ्लोरिडाला चालले होते. दरम्यानच्या प्रवासात त्यांनी एकाच्या तोंडावर दणादण मुक्के दिलेत. मारहाण करण्याआधी माईक टायसननं या प्रवाशाला समजावण्याचाही प्रयत्न केला. मात्र प्रवासी काही ऐकला नाही. अखेर माईक टायसननं या प्रवाशावर तुटूनच पडला. यात प्रवाशाच्या तोंडातून रक्तही वाहू लागलं होतं.

बलात्कारप्रकरणी टायसनला जेल

दरम्यान, माईक टायसनला एका बलात्कार प्रकरणी जेलची शिक्षाही भोगावी लागली होती. 1996 नंतर माईकनं कोणतीच स्पर्धा जिंकलेली नाही. 1997 मध्ये तर माईकनं आपल्या विरोधी खेळाडूचा कानच चावला होता. तसंच त्याच्यावर बलात्काराचा आणि अंमली पदार्थांचं सेवन करण्याचा आरोपही करण्यात आला होता. यानंतर जेलची हवादेखील माईकला खावी लागली होती. दरम्यान, आता समोर आलेल्या व्हायरल व्हिडीओबाबत अमेरिकेतील पोलिसांचं किंवा माईक टायसनचं कोणतंही स्पष्टीकरण अद्यापतरी समोर आलेलं नाही.

पाहा व्हिडीओ :

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.