AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohammed Siraj : समोर बॉस, आदर्श आणि बदला…सिराजची अवस्था बघा, हा VIDEO सगळं काही सांगून जातो

Mohammed Siraj : RCB विरुद्ध सामन्यात गुजरात टायटन्सचा गोलंदाज मोहम्मद सिराज इमोशनल झाला होता. एक क्षण असं वाटलं की तो आता रडेल. हे सर्व समोर विराट कोहली असताना घडलं. या घटनाक्रमामध्ये शुभमन गिलची बॉीडी लँग्वेज सुद्धा सगळं काही सांगून जात होती.

Mohammed Siraj : समोर बॉस, आदर्श आणि बदला...सिराजची अवस्था बघा, हा VIDEO सगळं काही सांगून जातो
Mohammed Siraj Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Apr 03, 2025 | 12:32 PM

IPL 2025 मध्ये बुधवारी 2 एप्रिलला RCB आणि गुजरात टायटन्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये गुजरात टायटन्सने RCB ला हरवलं. बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरात टायटन्सने 8 विकेटने विजय मिळवला. मोहम्मद सिराज गुजरातच्या या विजयाचा नायक ठरला. त्याने 3 विकेट काढले. विजयाचा हिरो ठरलेला मोहम्मद सिराज या मॅचमध्ये इमोशनलही झाला होता. एकवेळ असं वाटलं की, त्याच्या डोळ्यातून अश्रू येतील. मोहम्मस सिराजसमोर विराट कोहली स्ट्राइकवर असताना हे घडलं.

RCB विरुद्ध गुजरात टायटन्सने पहिली गोलंदाजी केली. मोहम्मद सिराज पहिली ओव्हर टाकण्यासाठी आला. RCB कडून फिल सॉल्ट आणि विराट कोहलीने फलंदाजी सुरु केली. सिराजने पहिला चेंडू सॉल्टला टाकला. त्यावर त्याने एक धाव घेतली. त्यानंतर सिराज दुसरा चेंडू टाकण्यासाठी धावला. समोर विराट कोहली होता. सिराजने चेंडू टाकण्यासाठी रन-अप घेतला होता. पण मध्येच तो थांबला. सिराज इमोशनल झाल्याच चेहऱ्यावरुन दिसत होतं. असं वाटलं की, तो आता रडेल.

सिराज आणि विराटमध्ये मैदानावर जे घडलं, ते गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिलच्या बॉडी लँग्वेजमध्ये दिसून आलं. गिलच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि सिराज आणि विराटमधला तो क्षण यातून सगळं काही कळून येतं.

तो का इमोशनल झालेला?

मॅच संपल्यानंतर सिराजला या बद्दल विचारण्यात आलं. त्याला विचारण्यात आलं की, तो का इमोशनल झालेला?. त्यावर त्याने उत्तर दिलं की, हो, मी भावूक झालेलो, कारण RCB सोबत 7 वर्षाचा बॉन्ड होता. विराट कोहली त्याचा आदर्श होता. त्याशिवाय थोडा नर्वसनेस सुद्धा होता. सिराजने मॅचच्या सुरुवीताला फिल सॉल्ट आणि देवदत्त पडिक्कल यांची विकेट काढून RCB चा खेळ बिघडवला. त्यानंतर खतरनाक दिसणाऱ्या लिविंगस्टनच्या अर्धशतकीय इनिंगला विराम लावला. त्याने गुजरात टायटन्सच्या विजयाचा पाया रचला.

भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र.
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO
मराठी दाम्पत्यानं घातला डिलिव्हरी बॉय सोबत वाद, भांडूपमधला बघा VIDEO.
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?
सचिन अहीर पवारांच्या भेटीला अन् एकाच गाडीतून प्रवास, काय झाली चर्चा?.
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती
केंद्रीय कॅबिनेट बैठकीत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, सुत्रांची माहिती.
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला
अजित पवार हा फुटलेला गट आहे, संजय राऊतांचा टोला.
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर
चुकून पाकच्या हद्दीत गेलेला तो जवान भारतात; कुटुंबीयांच्या भावना अनावर.