IPL 2020, CSK vs KKR : गोलीकीपर प्रमाणं झेपावत धोनीनं घेतला कॅच, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव

महेंद्रसिंह धोनीने गोलकीपर प्रमाणे झेप घेत फलंदाज शिवम वामीचा झेल घेतला. यामुळे धोनीचे चाहते खुश झाले आहेत.

IPL 2020, CSK vs KKR : गोलीकीपर प्रमाणं झेपावत धोनीनं घेतला कॅच, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Follow us
| Updated on: Oct 07, 2020 | 11:36 PM

अबुधाबी: कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्जमध्ये आयपीएलचा 21 सामना झाला. या सामन्यात महेंद्रसिंह धोनीने गोलकीपर प्रमाणे झेप घेत फलंदाज शिवम वामीचा झेल घेतला. यामुळे धोनीचे चाहते खुश झाले आहेत. सोशल मीडियावर चाहत्याकंडून धोनीचं कौतुक करण्यात येत आहे. (MS Dhoni dives and take spectacular catch of Shivam Vami)

ड्वेन ब्राव्होने चेन्नईकडून 20 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. अखेरच्या षटकातील 5 वा चेंडू फटकावण्याच्या प्रयत्नात शिवम वामीच्या बॅटला लागून चेंडू धोनीकडे गेला. एका हाताने कॅच घेण्याच्या प्रयत्नात धोनीच्या हाताला लागून चेंडू हवेत गेला. धोनीने यानंतर फुटबॉलमधील गोलकीपर प्रमाणे झेपावत कॅच घेतला. धोनीच्या या अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे त्याच्यावर टीका करणाऱ्यांची बोलती बंद झाली.

आयपीएलमध्ये सर्वाधिक कॅच घेणारा विकेटकीपर

शिवम वामीचा कॅच घेत धोनी आयपीएलमध्ये सर्वाधिक कॅच घेणारा विकेटकीपर ठरला आहे. त्याने 104 कॅच घेतले आहेत. तर दिनेश कार्तिकच्या नावावर 103 कॅच आहेत. धोनीनं घेतलेल्या कॅच नंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे. चाहत्यांकडून धोनीचं अभिनंदन करण्यात येत आहे.

ड्वेन ब्राव्होच्या आयपीएलमध्ये 150 विकेट

शिवम वामीची विकेट मिळाल्यानंतर ड्वेन ब्राव्होने आयपीएलमधील 150 विकेटचा टप्पा पूर्ण केला आहे. ब्राव्होने आजच्या सामन्यात 37 धावांमध्ये 3 विकेट घेतल्या.

चेन्नई समोर विजयासाठी 168 धावांचे आव्हान

कोलकाता नाईट रायडर्सनं प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर विजयासाठी 168 धावांचं आव्हान ठेवलं आहे. राहुल त्रिपाठीनं कोलकाता साठी सर्वाधिक 81 धावा केल्या.

दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा 10 धावांनी पराभव झाला आहे. 20 ओव्हरमध्ये चेन्नईचा संघ 5 गडी बाद 157 धावा करु शकला.

संबंधित बातम्या :

IPL 2020, CSK vs KKR : चेन्नई सुपर किंग्जला 168 धावांचे लक्ष्य

‘या’ कारणांमुळे राजस्थानचा दारुण पराभव; जोस बटलरचा संताप

(MS Dhoni dives and take spectacular catch of Shivam Vami)

थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.