MS Dhoni Azadi Ka Amrit Mahotsav : “माझं नशीब आहे की मी भारतीय आहे, महेंद्र सिंग धोनीची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत

महेंद्र सिंग धोनी याने त्याचा इंस्टाग्रामवर डिपी बदलल्यापासून त्याच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. त्याचबरोबर महेंद्र सिंग धोनीची पोस्ट शेअर देखील केली आहे.

MS Dhoni Azadi Ka Amrit Mahotsav : माझं नशीब आहे की मी भारतीय आहे,  महेंद्र सिंग धोनीची इंस्टाग्राम पोस्ट चर्चेत
हा पाकिस्तानी फलंदाज धोनीसारखा खेळतो, पाकिस्तानच्या माजी खेळाडूचं धक्कादायक वक्तव्य Image Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Aug 13, 2022 | 12:17 PM

मुंबई : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असल्यामुळे भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) उत्साहात साजरा केला जात आहे. भारत सरकारच्या (India Government) आवाहनावर प्रत्येक घराघरात तिरंगा मोहीम राबविली जात आहे. देशवासी तिरंग्याचे छायाचित्र आपल्या प्रोफाईल फोटोवर सोशल मीडियावर टाकत आहेत. आत्तापर्यंत अनेकांनी सोशल मीडियावर तिरंगा डिपी म्हणून ठेवला आहे. त्यामध्ये राजकीय नेत्यांनी सुध्दा आपली डिपीवर तिरंग्याचा फोटो लावला आहे. त्यामध्ये अनेक क्रिकेटर, सेलिब्रिटी सुध्दा आहेत. आज भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni) याने सुध्दा आपल्या इंस्टाग्रामवर त्याचे प्रोफाइल चित्र बदलले आहे. त्याने अपलोड केलेल्या फोटोमध्ये तिरंगा आहे. तसेच त्या तिरंग्यावरती एक खास संदेश देखील लिहिला आहे. माझे नशीब आहे की मी भारतीय आहे.

क्रिकेटपटू इरफान पठाण याने आपल्या घरी तिरंगा फडकावला

महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर खूपच कमी सक्रिय असतो. महेंद्रसिंग धोनी बराच वेळ फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर काहीही पोस्ट करत नाही. परंतु प्रत्येक घरात तिरंगा फडकवण्याच्या विशेष मोहिमेत त्याने भाग घेतला आहे. हर घर तिरंगा मोहिमेत महेंद्रसिंग धोनीशिवाय इतर अनेक क्रिकेटपटूही सहभागी आहेत. माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने आपल्या घरी तिरंगा फडकावला, त्याचबरोबर 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान होणाऱ्या तिरंगा मोहिमेत चाहत्यांना सहभागी होण्याचे आवाहन केले.

हे सुद्धा वाचा

धोनीची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल

महेंद्र सिंग धोनी याने त्याचा इंस्टाग्रामवर डिपी बदलल्यापासून त्याच्या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. त्याचबरोबर महेंद्र सिंग धोनीची पोस्टचा फोटो देखील शेअर केला आहे. त्यामुळे महेंद्र सिंग धोनी याची इंन्स्टाग्राम पोस्ट अधिक चर्चेची ठरली आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पुर्ण होत असल्यामुळे केंद्र सरकारकडून देशात अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. सोशल मीडिया वापरणाऱ्या अनेकांनी आपल्या डिपीच्या जागेवर तिरंगा ठेवला आहे.

Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?
'बकरे की माँ कब तक दुवा मागेंगी ,' काय म्हणाले सुरेश धस?.
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका
अंजली दमानिया रिचार्जवर चालणाऱ्या ताई, राष्ट्रवादीच्या नेत्याची टीका.
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी
माझ्या कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज, देशमुख यांच्या कन्येची मागणी.
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.