वय वाढलं, पण फिटनेसबद्दल बोलण्याची कोणाचीही हिम्मत नव्हती, धोनीच्या निवृत्तीची कारणे कोणती?
माजी कर्णधार एम एस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला, तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. MS Dhoni Retires
मुंबई : टीम इंडियाचा माजी यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे. भारताला टी 20 आणि वन डे विश्वचषक मिळवून देणाऱ्या धोनीच्या निवृत्तीची चर्चा गेल्या काही दिवसापासून सुरु होती. मात्र आज अचानक धोनीच्या निवृत्तीची घोषणा आली आणि चाहत्यांना धक्काच बसला. (MS Dhoni Retires)
धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला असला, तरी तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. त्यामुळे अचानक निवृत्ती जाहीर करुन धक्का बसलेल्या चाहत्यांना हा थोडासा दिलासा म्हणावा लागेल. (MS Dhoni Retires)
39 वर्षीय महेंद्रसिंह धोनीने भारतीय क्रिकेटला नवं आयाम दिलं. धोनीने भारताला पहिला टी 20 विश्वचषक, 2011 मध्ये वन डे विश्वचषक आणि भारतीय संघाला कसोटीमध्ये अव्वलस्थान असं सर्व काही मिळवून दिलं. धोनीने तीनही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची धुरा सांभाळली.
धोनीच्या निवृत्तीची कारणे
वाढतं वय – महेंद्रसिंह धोनी सध्या 39 वर्षांचा आहे. 7 जुलै 1981 रोजी जन्मलेल्या धोनीने यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याने आंतरराष्ट्रीय वन डे आणि टी 20 क्रिकेटला अलविदा केला आहे. गेल्या काही दिवसापासून धोनीच्या वाढत्या वयाकडे बोट दाखवलं जात होतं. मात्र धोनीच्या फिटनेसबाबत बोलण्याची कोणाचीही हिम्मत झाली नाही.
ढासळलेला परफॉर्म 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आल्यानंतर धोनीने भारतीय संघातलं आपलं स्थान गमावलं होतं. धोनीचं वाढतं वय लक्षात घेता, तो संघात पुनरागमन करण्याची शक्यता धूसर होती. यंदाच्या टी 20 विश्वचषकात धोनीला संधी मिळेल अशी आशा होती, पण कोरोनामुळे वर्ल्डकप रद्द झाल्याने धोनीची संधी हुकली.
C ग्रेडमध्येही नाव नाही
बीसीसीआयने जानेवारी 2020 मध्ये भारतीय खेळाडूंच्या वार्षिक कराराची यादी जाहीर केली होती. त्यावेळी बीसीसीआयने वार्षिक कराराच्या यादीतून टीम इंडियाचा माजी कर्णधार एम एस धोनीचं (M S Dhoni dropped from BCCI’s list) नाव वगळलं होतं. ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2020 या काळासाठी करण्यात आलेल्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीत महेंद्रसिंह धोनीचं (M S Dhoni dropped from BCCI’s list) नाव नाही.
धोनीची कारकीर्द
महेंद्र सिंग धोनीने त्याच्या कारकिर्दीत 90 कसोटी सामने खेळले. या कसोटी सामन्यांमध्ये त्याने 6 शतक, एक द्विशतक, 33 अर्धशतक केली आहेत. त्याने कसोटी सामन्यात एकूण 4 हजार 876 धावा केल्या आहेत.
धोनीने 350 एकदिवसीय सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 10 हजार 773 धावा केल्या आहेत. यामध्ये 10 शतक, 79 अर्धशतकांचा समावेश आहे.
धोनी आपल्या कारकीर्दीत 98 टी-20 सामने खेळले. या सामन्यांमध्ये त्याने एकूण 1 हजार 617 धावा केल्या आहेत. धोनीने 190 आयपीएल सामने खेळले. यामध्ये त्याने एकूण 4 हजार 432 धावा केल्या आहेत.
धोनीने आपल्या कारकिर्दीत एकूण 16 शतकं केली आहेत. यामध्ये 10 शतकं एकदिवसीय सामन्यांमधील आहेत. तर 6 शतकं ही कसोटी सामन्यांमधील आहेत.
संबंधित बातम्या
MS Dhoni Retirement | महेंद्रसिंह धोनीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
बीसीसीआयने धोनीचं नाव करार यादीतून वगळलं, C ग्रेडमध्येही नाव नाही!
…म्हणून धोनी ‘बीसीसीआय’च्या वार्षिक करारासाठी अपात्र
Sushant Singh Rajput | आधी संतोष लाल, आता सुशांत, सात वर्षात दोन मित्र गमावले, धोनीला शब्द फुटेनात