AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 नंतर संन्यास ? धोनीचं स्पष्ट उत्तर, मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर मोठं वक्तव्य

आयपीएल 2025 च्या 38 व्या मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपरकिंग्जला 9 विकेट्सनी हरवलं. मॅचनंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने जे वक्तव्य केलं, त्याने सर्व जण हबकलेच.

IPL 2025 नंतर संन्यास ? धोनीचं स्पष्ट उत्तर, मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर मोठं वक्तव्य
एम.एस.धोनीImage Credit source: PTI
| Updated on: Apr 21, 2025 | 8:58 AM
Share

इंडियन प्रीमियर लीग 2025 च्या 38 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून मुंबई इंडियन्सने विजयाची हॅटट्रिक नोंदवली. या विजयासह, मुंबई इंडियन्सचा संघ हा 8 सामन्यांत 4 विजय आणि 4 पराभवांसह पॉइंट टेबलमध्ये सहाव्या स्थानावर आहे. तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ एवढ्याच मॅचेस खेळला सला तरी फक्त 2 विजयांसह पॉइंट टेबलमध्ये अगदी तळाशी आहे. मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्मा हा चेन्नईविरुद्धच्या विजयाचा नायक होता, ज्याने शानदार अर्धशतकी खेळी केली. त्याला सूर्यकुमार यादवने चांगली साथ दिली. मात्र या ,सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने असे काही धक्कादायक वक्तव्य केलं, जे ऐकून सर्वच हबकले.

पुढच्या सीझनमध्ये करू दमदार पुनरागमन

सामन्यानंतर, सीएसकेचा कर्णधार असलेला धोनी म्हणाला की, आमच्या संघाची कामगिरी खूपच सरासरी होती. मला माहित होते की सामन्याच्या दुसऱ्या भागात काही प्रमाणात दव पडेल, असेही तो म्हणाला.. जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम डेथ बॉलरपैकी एक आहे आणि मुंबई इंडियन्सने त्यांची डेथ बॉलिंग लवकर सुरू केली, ज्यामुळे आम्हाला जास्त धावा करता आल्या नाहीत, असे धोनीने नमूद केलं.आयुष म्हात्रेने चांगली फलंदाजी केली आणि त्याचे शॉट्सही चांगले निवडले. आम्हाला माहित होते की या खेळपट्टीवर धावा करणे सोपे होणार नाही. जर तुम्ही सुरुवातीच्या षटकांमध्ये जास्त धावा दिल्या तर ते कठीण होते, असे धोनी म्हणाला.

आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे की आपण केवळ चांगले क्रिकेट खेळल्यामुळेच यशस्वी होतो. त्यामुळे आपण जास्त भावनिक होता कामा नये. एका वेळेस आपण एकाच मॅचवर लक्ष दिलं पाहिजे आणि जर प्लेऑफमध्ये जागा मिळाली नाही तर पुढल्या सीझनच्या रणनितीचा विचार करावा लागेल. पुढल्या सीझनबद्दल सूतोवाच करून धोनीने अप्रत्यक्षरित्या संकेत दिले की तो आयपीएल 2026 च्या सीझनमध्ये खेळू शकतो.

फलंदाजांची काढली खरडपट्टी

आम्ही सरासरी धावसंख्येपेक्षा थोडे कमी धावा केल्या. मुंबईने त्यांची डेथ बॉलिंग लवकर सुरू केली, असे सामन्यानंतर धोनीने सांगितलं. आम्हीही लवकर स्लॉग शॉट्स खेळायला हवे होते, त्यांनी फिरकी गोलंदाजी चांगली खेळली आणि आम्ही कधीही मोठी, लढण्यालायक स्कोअर केला नाही. तुम्ही पहिल्या सहा षटकांत जास्त धावा दिल्या तर याचा अर्थ असा नाही की चेंडू बॅटवर व्यवस्थित येत आहे, असे तो म्हणालाय आयपीएलमध्ये मुंबईविरुद्धच्या या पराभवामुळे सीएसकेच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.