AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2025 Playoff : प्लेऑफमध्ये पोहोचण्याठी मुंबई इंडियन्सला अजून किती सामने जिंकावे लागतील?

IPL 2025 Playoff : यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफमध्ये पोहोचणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. कारण मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली होती. पण चिंता करण्याची गरज नाही. मुंबईची टीम सुद्धा प्लेऑफमध्ये पोहोचू शकते, ते गणित कसं आहे ते समजून घ्या.

IPL 2025 Playoff :  प्लेऑफमध्ये पोहोचण्याठी मुंबई इंडियन्सला अजून किती सामने जिंकावे लागतील?
hardik pandya mumbai indians ipl 2025Image Credit source: IPL/BCCI
| Updated on: Apr 18, 2025 | 1:07 PM
Share

मुंबई इंडियन्सकडून काल सनरायजर्स हैदराबादचा पराभव झाला. IPL 2025 मध्ये सनरायजर्स हैदराबादचा हा पाचवा पराभव आहे. आतापर्यंत खेळलेल्या सात सामन्यात SRH चा हा पाचवा पराभव आहे. पण प्लेऑफमध्ये पोहोचण्याची SRH कडे अजूनही संधी आहे. 5 मॅच हरल्यानंतरही आयपीएलमध्ये ऑरेंज आर्मीच्या नावाने प्रसिद्ध असलेली हैदराबादची टीम प्लेऑफमध्ये पोहोचू शकते. शेवटचा चेंडू पडत नाही, तो पर्यंत गेम ओव्हर समजू नका, असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं. सनरायजर्स हैदराबादच सुद्धा असच आहे. IPL 2025 मध्ये SRH ने सातपैकी पाच सामने गमावले आहेत. पण सात सामने अजून बाकी आहेत. त्यामुळे हैदराबादची टीम अजूनही प्लेऑफमध्ये पोहोचण्याची आशा जिवंत आहे.

IPL 2025 च्या ग्रुप स्टेजमध्ये सर्वच टीम्स प्रत्येकी 14 सामने खेळणार आहे. यात सर्वच टीम्सचे 7 सामने जवळपास पूर्ण झाले आहेत. 7 पैकी 5 सामने गमावल्यामुळे सनरायजर्स हैदराबादची टीम पॉइंट्स टेबलमध्ये शेवटून दुसरी म्हणजे 9 व्या स्थानावर आहे. पण अजूनही त्यांचा प्लेऑफ म्हणजे टॉप 4 मध्ये पोहोचण्याचा मार्ग खुला आहे. ते कसे पोहोचू शकतात ते समीकरण समजून घ्या.

इतके पॉइंट म्हणजे प्लेऑफचा तिकीट पक्क करण्याचं पहिलं पाऊल

टॉप फोरमध्ये जाण्यासाठी सनराजयर्स हैदराबादला उर्वरित सर्वच्या सर्व 7 सामने जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. पण असं झालं नाही, तर कमीत कमी 7 पैकी 6 सामने जिंकावे लागतील. सध्या 7 पैकी 2 सामने जिंकून त्यांचे 4 पॉइंट आहेत. पुढच्या सात पैकी 6 सामने जिंकल्यास त्यांचे 12 पॉइंट होतील. एकूण मिळून त्यांचे 16 पॉइंट होतील. ग्रुप स्टेजमध्ये 16 पॉइंट हे प्लेऑफच तिकीट पक्क करण्याचं पहिल पाऊल आहे.

आव्हान कठीण पण अशक्य नाही

सनरायजर्स हैदराबादला उर्वरित 7 सामन्यांपैकी 3 मॅच आपल्या होमग्राऊंडवर हैदराबादला खेळायच्या आहेत. घरच्या मैदानावर मॅच आहे, तर भिती कसली असं तुम्ही म्हणू शकता. पण 7 पैकी 4 सामने त्यांच्या घरच्या मैदानावर झाले, तिथे ते दोन जिंकले, दोन हरले. म्हणजे 50-50 चा विषय आहे. उर्वरित 7 पैकी 3 सामने हैदराबाद येथे तर चार सामने चेन्नई, अहमदाबाद, लखनऊ आणि बंगळुरु येथे होणार आहेत. आव्हान कठीण आहे, पण दोनवेळ चॅम्पियन बनलेल्या सनरायजर्ससाठी हे अशक्य सुद्धा नाही.

मुंबई इंडियन्सला अजून किती सामने जिंकावे लागतील?

मुंबई इंडियन्सलाही प्लेऑफमध्ये पोहोचण शक्य आहे. 16 पॉइंट्स प्लेऑफचा पहिला टप्पा मानला जात असेल, तर सध्या मुंबईचे 6 पॉइंट्स आहेत, म्हणजे अजून 10 पॉइंट्सची आवश्यकता आहे. 7 पैकी निदान पाच सामने मुंबई इंडियन्सला जिंकावेच लागतील. सध्या चार पराभव आणि तीन विजयांसह मुंबई इंडियन्सचे सहा पॉइंट्स आहेत. 7 व्या स्थानावर असलेल्या मुंबई इंडियन्सचा रनरेटही प्लसमध्ये आहे.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.