IPL 2020: नव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सची जर्सी स्कायडायव्हरकडून लॉन्च, व्हिडीओ व्हायरल

आयपीएलचा चॅम्पियन राहिलेल्या राजस्थान रॉयल्स संघाची (Rajasthan Royals) जर्सी अनोख्या पद्धतीने लॉन्च झाली आहे (New Jersey of Rajasthan Royal for IPL 2020).

IPL 2020: नव्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सची जर्सी स्कायडायव्हरकडून लॉन्च, व्हिडीओ व्हायरल
Follow us
| Updated on: Sep 16, 2020 | 8:18 PM

अबुधाबी : इंडियन प्रीमिअर लीगचा (Indian Premier League) नवा हंगाम सुरु होण्यासाठी आता केवळ 9 दिवस बाकी आहेत. आयपीएलमधील सर्वच्या सर्व 8 टीम अगदी जोमाने तयारीला लागलेल्या आहेत. सरावात सर्वच खेळाडू घाम गाळताना दिसत आहेत. खेळाडूंसोबतच या संघांच्या फ्रेंचायजी देखील नव्या रंगात दिसण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यातच आता आयपीएलचा चॅम्पियन राहिलेल्या राजस्थान रॉयल्स संघाची (Rajasthan Royals) जर्सी अनोख्या पद्धतीने लॉन्च झाली आहे (New Jersey of Rajasthan Royal for IPL 2020). राजस्थान रॉयल्सची जर्सी थेट स्कायडायव्हरच्या माध्यमातून लॉन्च करण्यात आली.

संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) 19 सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी राजस्थान रॉयल्सचा (RR) संपूर्ण संघ दुबईत दाखल झाला आहे. येथेच त्यांचा सरावही सुरु आहे. दुबईत बुधवारी (9 सप्टेंबर) राजस्थान रॉयल संघाने या नव्या आयपीएल हंगामासाठी आपली जर्सी (Rajasthan Royals Jersey) लॉन्च केली.

स्कायडाइवरकडून अनोख्या पद्धतीने जर्सी लॉन्च

जर्सी लॉन्चसाठी राजस्थान रॉयल्सचे सर्व खेळाडू ट्रेनिंग सेशननंतर दुबईच्या प्रसिद्ध बीचवर (Dubai Beach) गेले. त्या ठिकाणी सर्वच खेळाडूंनी मौजमजा केली. संघातील युवा खेळाडू रियान पराग शिवाय (Riyan Parag) इतर कुणालाही संघाच्या नव्या जर्सीचं लॉन्चिंग होणार याची कल्पना नव्हती. ते बीचवर फिरत असतानाच आकाशातून एक स्कायडायव्हर खाली येताना दिसला. तो हळूहळू राजस्थान संघाच्या दिशेनेच येत होता.

स्कायडायव्हरने खेळाडूंच्या जवळ लँडिंग करत एक बॅग खाली ठेवली आणि रियान परागला आपल्या जवळ बोलावलं. रियानने बॅगमधून आपल्या संघाची नव्या हंगामासाठीची जर्सी काढली. तसेच एक-एक जर्सी डेविड मिलर (David Miller) आणि रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) यांनाही दिली. अशाप्रकारे सरप्राईज पद्धतीने नव्या जर्सीचं लॉन्चिंग पाहून अनेक खेळाडू अवाक झाले. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

जर्सीत नव्या आणि जुन्याचा संगम

राजस्थानच्या जर्सीत जुन्या आणि नव्याचा चांगलाच संगम झालेला दिसला. जर्सीचा वरचा भाग निळा आणि खालचा भाग गुलाबी रंगाचा आहे. 2008 ते 2018 पर्यंत राजस्थान रॉयल संघ प्रत्येक हंगामात निळ्या रंगातच दिसला आहे. यात 2019 मध्ये गुलाबी रंग घेण्यात आला. तो ‘पिंक सिटी’ जयपूरची ओळख मानला जातो. यावर्षी मोठा बदल म्हणजे फ्रेंचायजी म्हणून मुख्य स्पॉन्सर TV9 भारतवर्षला खास स्थान देण्यात आलं आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020 | प्रेमाच्या पिचवर पृथ्वी शॉची विकेट, अभिनेत्रीला डेट करत असल्याच्या चर्चा

IPL 2020 चे वेळापत्रक अखेर जाहीर, मुंबई इंडियन्स ‘या’ संघासोबत सलामीला भिडणार

IPL 2020 | चेन्नईची दुसरी विकेट! रैनापाठोपाठ आणखी एका दिग्गज खेळाडूची माघार

New Jersey of Rajasthan Royal for IPL 2020

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.