ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना टीम इंडियाचा एडिलेड कसोटी सामन्यात 36 धावांवर डाव आटोपला होता. हा निच्चांकी धावसंख्येचा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे.
न्यू साऊथ वेल्स विरुद्ध तस्मानिया यांच्यातील प्रथम श्रेणी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात न्यू साउथ वेल्सचा डाव अवघ्या 32 धावांवर आटोपला. यासह NSW च्या नावे लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे.
टीम इंडिया आणि NSW या दोन्ही टीमने ही निराशाजनक कामगिरी केली. त्या सामन्यात एक साधर्म्य आहे. या दोन्ही सामन्यातील विरोधी संघांनी दुसऱ्या डावात 191 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा एडिलेड कसोटीतील दुसरा डाव 191 धावांवर आटोपला होता. तसेच तस्मानिया टीमलाही दुसऱ्या डावात 191 धावांपर्यंतच मजल मारता आली.
याआधी न्यू साऊथ वेल्सच्या नावे 64 या निच्चांकी धावसंख्येची नोंद होती. त्यांनी ही निच्चांकी धावसंख्या तस्मानिया विरुद्ध केली होती.