New Zealand vs West Indies, 2nd T 20 | ग्लेन फिलिप्सचा पराक्रम, न्यूझीलंडकडून टी 20 मध्ये वेगवान शतक ठोकणारा पहिला फलंदाज
न्यूझीलंडने 3 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे.
माउंट माउनगुई : न्यूझीलंडने दुसऱ्या टी 20 सामन्यात वेस्ट इंडिजवर 72 धावांनी शानदार (West Indies vs New Zealand 2 nd T 20)विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने टी 20 मालिकाही जिंकली. या विजयासह न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्विवाद आघाडी घेतली. ग्लेन या विजयाचा शिल्पकार ठरला. ग्लेनने विंडिजविरुद्ध या सामन्यात तडाखेदार शतक ठोकलं. ग्लेनने 51 चेंडूत 10 फोर आणि 8 सिक्सच्या मदतीने 108 धावा केल्या. या शतकी कामगिरीसह त्याने पराक्रम केला आहे. Glenn Phillips becomes first New Zealand batsman to score fastest century in T20 cricket
? Third-highest T20I total for ???Fastest T20I century for Glenn Phillips?Highest T20I partnership in New Zealand
The hosts secured a clinical win over ? to seal the series with one game to go ?#NZvWI REPORT ?
— ICC (@ICC) November 29, 2020
ग्लेनने 46 चेंडूत शतक ठोकलं. ग्लेन न्यूझीलंडकडून टी 20 क्रिकेटमध्ये वेगवान शतक ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. ग्लेनने अवघ्या 22 चेंडूत 5 सिक्स आणि 3 चौकारांसह अर्धशतक ठोकलं. अर्धशतकी खेळीनंतर ग्लनने आणखी आक्रमकपणे फलंदाजी केली. ग्लेनने यानंतर किवींच्या गोलंदाजीवर जोरदार हल्ला चढवत तडाखेदार बॅटिंग केली. यासह त्याने 46 चेंडूत शतक पूर्ण केलं.
New Zealand's fastest T20I century ? Two catches and a run out ?
Glenn Phillips is named the Player of the Match after a stellar show in the second #NZvWI T20I! pic.twitter.com/v4RLSfP4B6
— ICC (@ICC) November 29, 2020
टी 20 क्रिकेटमधील तिसरा फलंदाज
ग्लेन टी 20 मध्ये 46 चेंडूत शतक ठोकणारा न्यूझीलंडचा पहिला तर एकूण तिसरा फलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रितकेच्या फॅफ डु प्लेसिस आणि टीम इंडियाच्या केएल राहुलनेही इतक्याच चेंडूत शतक ठोकलं आहे.
टी 20 मधील वेगवान शतक
टी 20 मध्ये वेगवान शतकाच्या बाबतीत दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर, टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्मा आणि चेक रिपब्लिकचा सुदेश विक्रमासेकरा या तिघांनी 35 चेंडूत शतक लगावण्याची कामगिरी केली आहे.
सामन्याचा लेखाजोखा
वेस्ट इंडिजने टॉस जिंकून न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडले. न्यूझीलंडने ग्लेन फिलिप्सच्या शतकी आणि डेव्हन कॉन्वेच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 238 धावा केल्या. यामुळे विंडिजला विजयासाठी 239 धावांचे आव्हान मिळाले. मात्र न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी विंडिजला 166 धावांवर रोखले. वेस्ट इंडिजला निर्धारित 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 166 धावाच करता आल्या. यासह न्यूझीलंडने विंडिजवर 72 धावांनी विजय मिळवला. या विजयासह न्यूझीलंडने 2-0 अशा फरकाने मालिकाही जिंकली. दरम्यान मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना सोमवारी 30 नोव्हेंबरला खेळण्यात येणार आहे.
New Zealand clinch the three-match T20I series with a game to spare ?
West Indies finish at 166/9 in response to New Zealand's 238/3!
What an emphatic performance by the hosts ? #NZvWI pic.twitter.com/pWbIXksNnK
— ICC (@ICC) November 29, 2020
संबंधित बातम्या :
Glenn Phillips becomes first New Zealand batsman to score fastest century in T20 cricket