French Open 2020 : नोवाक जोकोविचचा फॉर्म कायम, सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश

सध्याचा जगातला नंबर एकचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने फ्रेंच ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये स्पेनच्या पाब्लो कुरेनो बुस्तावर मात करत सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.

French Open 2020 : नोवाक जोकोविचचा फॉर्म कायम, सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश
Follow us
| Updated on: Oct 08, 2020 | 3:03 PM

पॅरीस : यूएस ओपन स्पर्धेत पंचांना बॉल मारल्याने चर्चेत असलेला टेनिसपटू नोवाक जोकोविचने टेनिस कोर्टवर शानदार पुनरागमन केले आहे. फ्रेंच ओपनच्या क्वार्टर फायनलमध्ये स्पेनच्या पाब्लो कुरेनो बुस्तावर मात करत जोकोविचने दिमाखात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.  (Novak Djokovic reached his 10th french open semi final by dedeating pablo carreno busta)

आज झालेल्या क्वार्टर फायलनच्या सामन्यात पहिल्या सेटमध्ये पाब्लोचे वर्चस्व पाहायला मिळाले. परंतु त्यानंतरच्या सेटमध्ये जगातल्या नंबर वन खेळाडूने (जोकोविच) त्याची ताकद दाखवून दिली. जोकोविचने पाब्लोवर सलग दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये वर्चस्व गाजवले. जोकोविचने पाब्लोचा 4-6, 6-2, 6-3, 6-4 असा पराभव केला.

या सामन्यात जोकोविच डाव्या हाताने खेळताना संघर्ष करत होता. तरीदेखील 03 तास 10 मिनिटं चाललेल्या या सामन्यात त्याने विजय मिळवला. आजच्या या विजयामुळे जोकोविचने 10 व्यांदा सेमीफायनल गाठली आहे.

सामना संपल्यानंतर जोकोविच म्हणाला की, “टेनिस कोर्टवर पाय ठेवल्यापासून मला फार बरं वाटत नव्हतं. इथं येण्यापूर्वी मला काही शारिरीक अडचणी दूर कराव्या लागल्या. त्यामुळे सुरुवातीला मी आक्रमकपणे खेळू शकलो नाही. सामना पुढे जात होता तसं मला बरं वाटू लागलं. त्यामुळे मी अधिक आक्रमक होऊन खेळू लागलो”.

प्रतिस्पर्धी पाब्लोबद्दल बोलताना जोकोविच म्हणाला की, “पाब्लो सुरुवातीला माझ्यापेक्षा चांगला खेळ करत होते. सुरुवातीचे दीड सेट त्यांनी सामन्यावर पकड मिळवली होती. त्यावेळी मला वाटत होतं की माझ्या पायांमध्ये फार शक्ती नाही, असं मला वाटत होतं”.

पुढील सामन्यात जोकोविच ग्रीसचा टेनिसपटू स्टीफानो सितसिपासशी भिडणार आहे. त्याने आंद्रे रुबलेववर मात करत सेमीफायनल गाठली आहे. तर दुसऱ्या सेमीफायनल सामन्यात फ्रेंच ओपनचा विद्यमान विजेता राफेल नदाल आणि डिएगो श्वार्ट्जमॅन भिडणार आहेत.

(Novak Djokovic reached his 10th french open semi final by dedeating pablo carreno busta)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.