Asian Games 2023 Medal Tally | टीम इंडियाचं 8 दिवसांनी मेडलचं ‘अर्धशतक’, सर्वाधिक पदकं कोणती?
Asian Games 2023 Medal Tally and winners list from India | एशियन गेम्स स्पर्धेत आतापर्यंत चीन अव्वल स्थानी विराजमान आहे. तर टीम इंडिया चौथ्या क्रमांकावर आहे. जाणून घ्या टीम इंडियाकडे आतापर्यंत सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक किती किती आहेत ते
बिजिंग | होंगझोऊ इथे गेल्या अनेक दिवसांपासून एशियन गेम्स 2023 स्पर्धेचा थरार रंगतोय. एशियन गेम्स स्पर्धेच्या आठव्या दिवशी अर्थात 1 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाच्या खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात ऐतिहासिक कामगिरी करत जगाला आपली दखल घेण्यात भाग पाडलंय. टीम इंडियाने रविवारी एकूण 15 पदकांची लयलूट केली. टीम इंडियाने यासह एका दिवसात सर्वाधिक मेडल जिंकण्याची कामगिरी केली. टीम इंडियाने याआधी तब्बल 13 वर्षांपूर्वी 2010 साली एशियन गेम्स स्पर्धेत एका दिवसात 11 मेडल जिंकण्याचा कारनामा केला होता. अशा प्रकारे टीम इंडियाने स्वत:चा 13 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक करत कीर्तीमान रचला आहे.
टीम इंडियाचं मेडल्संचं अर्धशतक
टीम इंडियाने स्पर्धेतील आठव्या दिवशी मेडल्सचं अर्धशतक पूर्ण केलं. टीम इंडियाच्या नावावर 1 ऑक्टोबर रोजी एकूण 53 मेडल्सची नोंद झाली आहे. या 53 मध्ये सर्वाधिक सिलव्हर मेडल आहेत. त्यानंतर दुसऱ्या स्थानी कांस्य पदक आहेत. तर तिसऱ्या स्थानी सुवर्ण पदकं आहेत. टीम इंडियाला आतापर्यंत एकूण 13 गोल्ड, 21 रौप्य आणि 19 कांस्य पदकं मिळाली आहेत.तर चीन सर्वाधिक पदकं जिंकण्याच्या यादीत टॉपर आहे. चीनने आतापर्यंत 243 मेडल्स जिंकले आहेत. यामध्ये 132 गोल्ड, 72 सिल्व्हर आणि 38 ब्राँझ मेडल्स आहेत.
टीम इंडिया आणि मेडल्स
With 15 medals won today, India at 4th spot in Medal Tally with 53 medals (13 🥇 | 21 🥈 | 19 🥉) #IndiaAtAsianGames #AGwithIAS #AsianGames2023 pic.twitter.com/saMoXb26cD
— India_AllSports (@India_AllSports) October 1, 2023
ज्योती याराजी हीला रौप्य पदक
टीम इंडियाच्या ज्योती याराजी हीने 100 मीटर हर्डल रेस प्रकारात रौप्य पदक मिळालं. ज्योतीला कांस्य पदकावर समाधान मानावं लागणार होतं. मात्र चीनची स्पर्धक बाद झाल्याने ज्योतीला कांस्य ऐवजी रौप्य पदक मिळालं.
सविता पूनिया हीने डिस्कस थ्रोमध्ये शानदार कामगिरी केली. मात्र शेवट गोड झाला नाही. मात्र त्यानंतरही पूनिया हीने 58.62 मीटर लांब थ्रो करत कांस्य पदक पटकावलं. तसेच नंदिनी अगासारा हीने 800 मीचर हेप्टाथेलॉनमध्ये ब्रॉन्झ मेड मिळवलं.
श्रीशंकर याची ‘उंच उडी’
श्रीशंकर याची सुवर्ण पदक मिळवण्याची संधी हुकली. मात्र त्याने रौप्य पदक मिळवलं.
तसेच टीम इंडियाला 1500 मीटर धावणीत 2 पदकं मिळाले. अजय कुमार सरोज याने रौप्य पदक मिळवलं. तर जिनसन जॉनसन याने कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. तर कतारच्या मोहम्मद अल गरनी याने सुवर्ण पदक मिळवलं.
ताजिंदरपाल सिंह याचा गोल्डन गोळाफेक
ताजिंदरपाल सिंह याने एशियन गेम्स स्पर्धेत गोळाफेकीत सलग दुसऱ्यांदा गोल्ड मेडल मिळवलं. ताजिंदरने याआधी 2018 साली गोल्ड मेडल मिळवलं होतं.
अविनाश साबळे याची ऐतिहासिक कामगिरी
महाराष्ट्रातील बीडच्या पोराने 3 हजार स्टीपलचेजमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. अविनाशने टीम इंडियाला एथलेटिक्समध्ये पहिलंवहिलं सुवर्ण मिळवून दिलं. अविनाशने 8:19:53 सेकंद या विक्रमी वेळेत त्याने 3 हजार मीटर पार करुन सुवर्ण पदक जिंकलं. तर वर्ल्ड चॅम्पियन निखत जरीन हीचा उपांत्य फेरीत पराभव झाला. निखतला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं.