World Athletics Championship : आजीची कमाल, जागतिक स्पर्धेत धमाल, वयाच्या 94व्या वर्षी मिळवलं सुवर्णपदक
भगवानी देवी यांनी 100 मीटर अंतर 24.74 सेकंदात पार केलं. तुम्ही म्हणाल वयाच्या शंभराला टेकलेल्या आजींनी ही किमया कशी पार केली. तर यापुढे ऐका, या आजी इथंच थांबत नाही. त्यांनी गोळाफेक प्रकारातही सहभाग घेतला होता. यातही त्यांनी कांस्यपदक पटकावलंय.
नवी दिल्ली : आजकाल पन्नाशी ओलांडली की लोकांना काम नकोस वाटतं. अहो पन्नाशी पण ठिक आहे. अलिकडे पस्तीशीतल्या लोकांना थोडे कष्ट पुरले की किती आराम करू आणि किती नको, असं होतं. पण, याउलट वद्धांमधील काहीतरी क्रिएटीव्ह करण्याची इच्छाशक्ती अधिक असल्याचं दिसून येतंय. कोणतंही चांगलं काम करण्यासाठी वयाचं बंधन नसतं, असं म्हणतात. असंच एक उदाहरण समोर आलंय. 94 वर्षांच्या भगवानी देवी डागर (Bhagwani Devi Dagar) यांनी तरुणाईला लाजवेल असं काम केलंय. त्यांनी या वयात फिनलंडमध्ये (Finland) सुरू असलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2022’ स्पर्धेमध्ये (World Athletics Championship) 100 मीटर स्प्रिंट म्हणजेच वेगात चालण्याच्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकावलंय. या आजीबाईंच्या या अनोख्या कामगिरीमुळे तरुणाई देखील अवाक झाली आहे.
वृत्तसंस्थेचं ट्विट
94-year-old Bhagwani Devi Dagar won a gold and 2 bronze for India at the World Masters Athletics championships 2022 in Finland, yesterday pic.twitter.com/JRPZrBDSAK
— ANI (@ANI) July 11, 2022
भगवानी देवी यांनी 100 मीटर अंतर 24.74 सेकंदात पार केलं. तुम्ही म्हणाल वयाच्या शंभराला टेकलेल्या आजींनी ही किमया कशी पार केली. तर यापुढे ऐका, या आजी इथंच थांबत नाही. त्यांनी गोळाफेक प्रकारातही सहभाग घेतला होता. यातही त्यांनी कांस्यपदक पटकावलंय. सोशल मीडियावर त्यांच्या या कामगिरीचं खूप कौतुक होतंय. या आजींच्या धैर्याला आणि आत्मविश्वासाला सोशल मीडियावर लोकांनी सलाम केला आहे.
युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर भगवानी देवींचा फोटो पोस्ट करून त्यांचं कौतुक केलंय. मंत्रालयानं त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, ‘भारतातील 94 वर्षीय भगवानी देवी यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की वय फक्त एक आकडा आहे. त्यांनी सुवर्ण आणि कांस्यपदके जिंकली. ही खरोखर साहसी कामगिरी आहे.’
क्रीडा मंत्रालयाचं ट्विट
India’s 94-year-old #BhagwaniDevi Ji has yet again proved that age is no bar!
She won a GOLD medal at the #WorldMastersAthleticsChampionships in Tampere in the 100m sprint event with a timing of 24.74 seconds.?She also bagged a BRONZE in Shot put.
Truly commendable effort!? pic.twitter.com/Qa1tI4a8zS
— Dept of Sports MYAS (@IndiaSports) July 11, 2022
भगवानी देवींचा नातू विकास डागर हा देखील पॅराअॅथलीट असून त्याला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. आता त्याची आजी असलेल्या भगवानी देवींनी पदके जिंकून आपणही कमी नसल्याचं दाखवून दिलंय. विशेष म्हणजे चेन्नईमध्ये झालेल्या नॅशनल मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतही भगवानी देवींनी तीन सुवर्णपदके जिंकली होती. या कामगिरीच्या बळावर त्यांनी वर्ल्ड मास्टर्स अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रवेश मिळवला.