AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bayern Maharashtra football cup : बहुचर्चित एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप टुर्नामेंटला सुरुवात

Bayern Mharashtra football cup : एफसी बार्यन महाराष्ट्र फुटबॉल कप टुर्नामेंटमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या 20 मुलांची निवड करण्यात येईल. त्यांना पुढील ट्रेनिंगसाठी जर्मनीच्या एफसी बार्यन म्युनिच क्लब येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे.

Bayern Maharashtra football cup : बहुचर्चित एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप टुर्नामेंटला सुरुवात
Girish mahajan
| Updated on: Feb 10, 2023 | 8:16 PM
Share

Fc Bayern maharashtra football cup : कुपरेज मैदानावर आजपासून एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप टुर्नामेंटला सुरुवात झाली आहे. काल मंत्रालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत एफसी बार्यन महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेच्या लोगोच अनावरण करण्यात आलं. आज राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत स्पर्धेच उद्घाटन झालं. यावेळी एफसी बायर्न म्युनिच क्लब दक्षिण आशियाचे प्रमुख Maximilian Haschke उपस्थित होते. गिरीश महाजन यांनी उपस्थित मुलांशी संवाद साधला व त्यांचा उत्साह वाढवला. आज जिल्हा आणि विभाग स्तरावरील स्पर्धेचा शुभारंभ झाला. 27 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान पुणे बालेवाडी येथे राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित होणार आहे. राज्याच्या सर्वच जिल्ह्यातून जवळपास 1 लाख मुलं या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेचा उद्देश काय?

एफसी बायर्न महाराष्ट्र फुटबॉल कप टुर्नामेंटमध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करणाऱ्या 20 मुलांची निवड करण्यात येईल. त्यांना पुढील ट्रेनिंगसाठी जर्मनीच्या एफसी बार्यन म्युनिच क्लब येथे प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. प्रशिक्षक, खेळाडू, कर्मचारी यांच्यासाठी एक मजबूत व्यासपीठ तयार करुन भारतातील फुटबॉल वाढीस मदत करणे, हा उद्देश आहे. या टुर्नामेंटमधून जर्मनीच्या एफसी बार्यन म्युनिच क्लबमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणारी मुलं मायदेशी परतल्यानंतर आपला अनुभव शेअर करतील. फुटबॉलचं कौशल्य इतरांसोबत शेअर करतील, जेणेकरुन फुटबॉल विकासाला चालना मिळेल.

जर्मनीला जाणाऱ्या खेळाडूंना काय संधी मिळणार?

राज्यातील उदयोन्मुख फुटबॉल खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने पाहण्याची, सराव करण्याची आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसोबत कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे. जर्मनीच्या विविध फुटबॉल क्लबसोबत या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल. बायर्न म्युनिच फुटबॉल क्लबची निवड का केली?

एफसी बायर्न म्युनिच हा जगातील अग्रगण्य आणि लोकप्रिय फुटबॉल क्लबपैकी एक आहे, जो आजमितीस जर्मन फुटबॉलमध्ये राष्ट्रीय लीग मध्ये 32 वेळा विजेता ठरलेला आहे. इतर आंतरराष्ट्रीय फुटबॉल सामन्यांमध्ये चॅम्पियन्स लीग 06 वेळा, UEFA कप 2 वेळा अशा प्रकारची कारकीर्द आहे. फुटबॉल आणि शिक्षणाद्वारे तरुणांचे जीवन सुधारणे. विविध कोचिंग आणि संशोधन मॉड्यूल्सद्वारे फुटबॉलचे ज्ञान आणि समज वाढवणे. तळागाळातील फुटबॉल खेळाला चालना देणे, हा स्पर्धेमागे उद्देश आहे.

मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन
वाल्मिक कराडचा काऊंटडाऊन सुरू? आरोप निश्चितीसाठी कोर्टाकडून डेडलाईन.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.