Maharashtra Football Cup 2023 | सेंट स्टॅनीस्लॉस हायस्कूलचा अंतिम सामन्यात पार्ले टिळकवर विजय
सेंट स्टॅनीस्लॉस हायस्कूल (बांद्रा) या संघानं अंतिम फेरीत पार्ले टिळक विद्यालयाचा पराभव करत विजय मिळवला.
मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकार आणि जर्मनी एफसी बायर्न क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र फुटबॉल कप स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबई शहरानंतर मुंबई उपनगरात ही स्पर्धा पार पडली. मुंबई उपनगरातून एकूण 36 संघांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा 15 फेब्रुवारी ते 17 फेब्रुवारी दरम्यान पार पडली. बांद्रा रिक्लेमशन येथील विंग्स स्पोर्टंस सेंटर इथे हा सामना पार पडला. या स्पर्धेत सेंट स्टॅनीस्लॉस हायस्कूल (बांद्रा) या संघानं अंतिम फेरीत पार्ले टिळक विद्यालयाचा पराभव करत विजय मिळवला. आता सेंट स्टॅनीस्लॉस हायस्कूल विभागवार स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे.
सेंट स्टॅनीस्लॉस हाय स्कूल, बांद्रा (प्रथम स्थान) पार्ले टिळक विद्यालय, पार्ले (द्वितीय स्थान) हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल, अंधेरी (तृतीय स्थान) डॉ. पिलई ग्लोबल अॅकाडमी, बोरिवली (चतुर्थ स्थान)
स्पर्धेचा उद्देश काय?
राज्याच्या वेगवेगळ्या भागात जिल्हा स्तरावर या स्पर्धा सुरु आहेत. महाराष्ट्राच्या मातीतून उत्तम फुटबॉलपटू घडवणं हा या स्पर्धेमागचा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक जिल्ह्यातून एक विजेता संघ निवडला जाणार आहे. विजेत्या टीमची दुसऱ्या जिल्ह्याच्या टीम बरोबर मॅच होईल. हा या स्पर्धेचा दुसरा टप्पा असणार आहे.
20 फुटबॉलपटूंना जर्मनीला जाण्याची संधी
या स्पर्धेत सर्वोत्तम खेळ दाखवणाऱ्या 20 फुटबॉलपटूंना जर्मनीला प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येणार आहे. बार्यन म्युनिच क्लबमध्ये महाराष्ट्रातील या खेळाडूंना ट्रेनिंग देण्यात येणार आहे.
या संधी मिळणार
राज्यातील उदयोन्मुख फुटबॉल खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने पाहण्याची, सराव करण्याची आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांसोबत कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे. जर्मनीच्या विविध फुटबॉल क्लबसोबत या खेळाडूंना खेळण्याची संधी मिळेल.