Wimbledon 2021, Men’s Final: नोव्हाक जोकोविच आणि मातेयो बेरेटिनीमध्ये अंतिम लढत, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?

जगातील अव्वल क्रमाकांचा टेनिसपटू नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) मातेयो बेरेटिनी (Matteo Berrettini) याच्यासोबत विम्बल्डन स्पर्धेची पुरुष एकेरीतील अंतिम लढत लढणार आहे. या सामन्याला आता अवघे काही तास शिल्लक आहेत.

Wimbledon 2021, Men’s Final: नोव्हाक जोकोविच आणि मातेयो बेरेटिनीमध्ये अंतिम लढत, सामना कधी, कुठे आणि कसा पाहणार?
नोव्हाक जोकोविच आणि मातेयो बेरेटिनी यांच्यात अंतिम लढत रंगणार आहे.
Follow us
| Updated on: Jul 11, 2021 | 2:02 PM

Wimbledon 2021 : विम्बल्डनमध्ये (Wimbledon 2021) या टेनिस जगतातील मानाच्या स्पर्धेत शनिवारी महिला एकेरीत ऑस्ट्रेलियाच्या अ‍ॅश्ले बार्टीने(Ashleigh barty) चेक रिपब्लिकची कॅरोलिना प्लिस्कोवा (Karolina Pliskova) हिला नमवत पहिल्यांदाच विम्बल्डनचा खिताब पटकावला. त्यानंतर आज (रविवारी) पुरुष एकेरीची अंतिम लढत आहे. हा सामना वर्ल्ड चॅम्पियन आणि नुकताच फ्रेंच ओपनवर नाव कोरलेला सर्बियाचा नोव्हाक जोकोविच (Novak Djokovic) इटलीच्या मातेयो बेरेटिनी (Matteo Berrettini) विरुद्ध खेळणार आहे. (Men Singles Final in Wimbledon 2021 Will played in Novak Djokovic vs Matteo Berrettini Know Date Time and where to watch in India)

भारतातही टेनिसचे अनेक चाहते आहेत. त्यामुळे या जगातील महत्त्वाच्या टेनिस स्पर्धेकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे. या सामन्याचा विचार करता 19 वेळा ग्रँड स्लॅम विजेता जोकोविच सामना करत असलेल्या इटलीच्या मातेयोने पहिल्यांदाच एखाद्या ग्रँड स्लॅमच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. तो इटली देशाचा पहिला टेनिसपटू आहे जो विम्बल्डनच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला आहे.

दोघांसाठी विजय अत्यंत ‘स्पेशल’

आजचा सामना जर नोव्हाकने जिंकला तर त्याचे हे 20 वे ग्रँड स्लॅम असेल. ज्यामुळे तो रॉजर फेडरर (Roger Federer) आणि राफेल नदाल (Rafael Nadal) यांच्या 20 ग्रँड स्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी करु शकतो. दुसरीकडे मातेयो याच्यासह त्याचा देश इटलीसाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा असू शकतो. कारण याआधी 1976 मध्ये फ्रेंच ओपन स्पर्धेत एड्रियानो पनाटा यांनी विजय मिळवत इटलीला पहिले ग्रँड स्लॅम मिळवून दिले होते. त्यानंतर इटलीचा टेनिसपटू खेळत असलेला हा पहिलाच ग्रँड स्लॅमचा अंतिम सामना आहे.

कधी खेळवला जाईल सामना?

नोव्हाक जोकोविच आणि मातेयो बेरेटिनी यांच्यातील सामना आज (रविवार) 11 जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी साडे सहा वाजता होईल.

कुठे पाहता येईल सामना?

विम्बल्डनचा हा पुरुष एकेरीचा सामना लाईव्ह स्टार स्पोर्ट्स सेलेक्ट 1 आणि स्टार स्पोर्ट्स सेलेक्ट HD  या चॅनेल्सवर पाहता येणार आहे.

कुठे असेल लाईव्ह स्ट्रीमिंग?

विम्बल्डनचा या सर्वात महत्त्वाच्या सामन्याची  लाईव्ह स्ट्रीमिंग डिजनी + हॉटस्टार वर पाहता येऊ शकते.

हे ही वाचा –

Wimbledon 2021, Women’s Singles Final : विम्बल्डनची नवी राणी, क्रिकेटपटू अश्र्ले बार्टीचा इतिहास, प्लिस्कोवाला नमवत विजेतेपदावर नाव कोरलं

Copa America Final Winner : अर्जेंटीना संघाचा ब्राझीलवर रोमहर्षक विजय, मेस्सीच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच संघाला मोठा मान

(Men Singles Final in Wimbledon 2021 Will played in Novak Djokovic vs Matteo Berrettini Know Date Time and where to watch in India)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.