Copa America 2021 : फायनलमध्ये मेस्सी आणि नेमार आमने-सामने, कोलंबियाला मात देत अर्जेंटीना अंतिम सामन्यात दाखल

कोपा अमेरिका चषक 2021 मध्ये सेमीफायनलच्या सामन्यात अर्जेंटीनाने कोलंबियाला पेनल्टी शूटआऊटमध्ये मात देत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला. यावेळी अर्जेंटीनाचा गोलकिपर एमिलियानो मार्टिनेजने वाचवलेल्या अप्रतिम गोल्मुळे तो विजयाचा शिल्पकार ठरला.

Copa America 2021 : फायनलमध्ये मेस्सी आणि नेमार आमने-सामने, कोलंबियाला मात देत अर्जेंटीना अंतिम सामन्यात दाखल
अर्जेंटीनाचा गोलकिपर एमिलियानो मार्टिनेजने पेनल्टी शूटआऊटमध्ये गोल सेव्ह करताना
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 12:10 PM

ब्राझिलिया : सध्या संपूर्ण फुटबॉल जगताचे लक्ष हे युरो चषक आणि कोपा अमेरिका चषकाकडे लागून आहे. त्यात कोपा अमेरिका 2021 ( Copa America 2021) या अमेरिकन देशात खेळल्या जाणाऱ्या फुटबॉल स्पर्धेत दोन्ही अंतिम सामन्याचे दावेदार मिळाले आहेत. विशेष म्हणजे जागतिक फुटबॉलमधील स्टार खेळाजू लिओनल मेस्सी (Lionel Messi) आणि नेमार (Neymar) या दोघांचे संघ अर्जेंटीना (Argentina) आणि ब्राझीलचं (Brazil) कोपाच्या अंतिम सामन्यात पोहचल्याने फुटबॉल जगतात मोठ्या उत्साहाचं वातावरण आहे. आधी ब्राझीलने पेरुला नमवत अंतिम सामना गाठला तर आता अर्जेंटीनाने कोलंबियाला मात देत (Argentina Beats colombia) अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. (Messis Argentina Team Beats colombia in Semi Final and enters In Copa America 2021 Final)

अर्जेंटीनाची आघाडी, पण कोलंबियाचेही पुनरागमन

अर्जेंटीना आणि कोलंबिया यांच्यातील सामन्यात सुरुवातीच्या काही मिनिटांतच अर्जेंटीनाने गोल करत आघाडी घेतली होती. 7 व्या मिनिटाला अर्जेंटीनाच्या लाटुरो मार्टिनेज (Lautaro Martínez) याने सामन्यात पहिला गोल करत संघाला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर पहिला हाल्फ संपेपर्यंत कोलंबियाचा संघ गोल करु शकला नाही. मात्र हाल्फ टाईमनंतर काही वेळाने म्हणजेत 61 व्या मिनिटाला लुइस डियाज (Luis Díaz) याने अर्जेंटीनाच्या गोलकीपरला चकवत गोल केला आणि सामन्यात कोलंबियाने 1-1 ची बरोबरी साधली. त्यानंतर मात्र दोनही संघाना एकही गोल करता न आल्याने सामन्याचा निर्णय पेनल्टी शूटआऊटने घेण्यात आला.

गोलकिपर ठरला विजयाचा शिल्पकार

पेनल्टी शूटआउटमध्ये अर्जेंटीनाच्या कर्णधार मेसीने पहल्या शॉटवर गोल करत आघाडी घेतली. कोलंबियाने देखील पहिला गोल केला. त्यानंतर मात्र मागील महिन्यातच अर्जेंटीनाकडून पदार्पण करणाऱ्या गोलकीपर एमिलियानो मार्टिनेज (Emiliano Martínez) अप्रतिम सेव्ह करत संघाला 3-2 च्या फरकाने विजय मिळवून दिला. या विजयासोबतच अर्जेंटीना अंतिम सामन्यात पोहचली असून विजयाचा खरा शिल्पकार ठरलेल्या मार्टिनेजचे सर्वांनीच अभिनंदन केले.

हे ही वाचा :

Copa America 2021 : नेमारची जादू आणि ब्राझील अंतिम सामन्यात दाखल, पेरु संघावर अप्रितम विजय, पाहा व्हिडीओ

Euro 2020 : 13 वर्षांपूर्वीचा बदला घेत इटलीची स्पेनवर मात, अंतिम सामन्यात इटली दिमाखात दाखल

Euro 2020 : बेल्जियमला मात देत इटली विजयी, सेमीफायनलमध्ये स्पेनशी होणार सामना

(Messis Argentina Team Beats colombia in Semi Final and enters In Copa America 2021 Final)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.