Neeraj Chopra | ‘तुम्ही सगळे रात्रभर…’; गोल्ड जिंकल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया!

Neeraj chopra Gold In world Championship 2023 : वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनल 2023 जिंकत पोराने दिवस रात्र घेतलेल्या मेहनतीचं फळ त्यासा मिळालं. गोल्ड जिंकल्यानंतर नीरजने पहिली प्रतिक्रिया देताना देशवासियांचे आभार मानत एक खास संदेश दिला आहे. 

Neeraj Chopra | 'तुम्ही सगळे रात्रभर...'; गोल्ड जिंकल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया!
मी सर्व देशवासियांचे आभार मानतो की तुम्ही सगळे रात्रभर जागे राहिलात आणि मला सपोर्ट केलंत. सर्वांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मेहनत करा आणि संपूर्ण जगात आपल्या देशाचं नाव करा, असं नीरज चोप्रा गोल्ड मेडल जिंकल्यानंतर म्हणाला.
Follow us
| Updated on: Aug 28, 2023 | 9:58 AM

मुंबई : भारताचा प्रसिद्ध भालाफेकपटू नीरज चोप्रा याने आणखी एक गोल्ड मेडल जिंकलं आहे. फायनलमध्ये पाकिस्तानच्या अरशद नदीम याने त्याला टफ फाईट दिलेली, अखेर नीरजने आपलं टार्गेट पूर्ण करत ऐतिहासिक कामगिरी केली. नीरज चोप्रा गोल्ड जिंकणार असा विश्वास सर्वांना होताच त्याने तो सार्थ ठरवला. वर्ल्ड अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशीप फायनल 2023 जिंकत पोराने दिवस रात्र घेतलेल्या मेहनतीचं फळ त्याला मिळालं. गोल्ड जिंकल्यानंतर नीरजने पहिली प्रतिक्रिया देताना देशवासियांचे आभार मानत एक खास संदेश दिला आहे.

काय म्हणाला नीरज चोप्रा?

मी स्वत:ला पूश केलं, स्पीडमध्ये माझं 100 टक्के देत होतो तसं नसतं झालं तर त्याची उणीव जाणवली असती. मी सर्व देशवासियांचे आभार मानतो की तुम्ही सगळे रात्रभर जागे राहिलात आणि मला सपोर्ट केलंत. सर्वांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मेहनत करा आणि संपूर्ण जगात आपल्या देशाचं नाव करा, असं नीरज चोप्रा म्हणाला.

नीरजने असं मिळवलं गोल्ड

नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा अरशद नदीम हे भालाफेकच्या फायनलमध्ये होते. पहिल्या भाला टाकताने तो फाऊल गेला त्यानंतर दुसऱ्यांदा त्याने 88.17 मीटर भाला फेकला. फायनलमध्ये त्याच्या पूढे कोणालाही जाता आलं नाही. अर्शदने 87.82 मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. त्याला रौप्य पदक मिळाले. जैकोब वाडले याने हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला त्याने 86.67 भाला फेकला. त्याला कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं.

नीरजने 2016 मध्ये ज्युनिअर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली होती नीरज तेव्हा अ‍ॅथलेटिक्समध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय ठरला होता. आता 7 वर्षांनी नीरजने इतिहासाची पुनरावृत्ती करत सिनिअर लेवलला वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकणारा पहिला भारतीय ठरला.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.