49 रन्सवर आऊट केलं म्हणून बॅट्समनने फिल्डरला बॅटने बडवलं, पोलीस ठाण्यात तक्रार, फिल्डर बेशुद्ध!
बॅट्समन संजय पालियाने फिल्डर सचिन पराशर याला बॅटने गंभीर मारहाण केलीय. या मारहाणीत सचिन गंभीर जखमी झालाय. संजयविरोधात पोलिस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला आहे. (Out for 49 runs the batsman hit the fielder with the bat In MP Gwalior)
मुंबई : मध्य प्रदेशातील आयोजित क्रिकेट मॅचदरम्यान भयंकर प्रकार घडला. 49 रन्सवर आऊट झाला म्हणून बॅट्समनने फिल्डरला बॅटने बडवलं. ग्वाल्हेरच्या स्थानिक क्रिकेट सामन्यात हा भयंकर घडला. संबंधित बॅट्समनविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय. (Out for 49 runs the batsman hit the fielder with the bat In MP Gwalior)
अर्धशतक एका धावेने हुकल्याचा राग…
मिळालेल्या माहितीनुसार, ग्वाल्हेरमध्ये एका स्थानिक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेदरम्यानच्या मॅचमध्ये एक बॅट्समन 49 धावांवर कॅच आऊट झाला. अर्धशतक केवळ 1 धावाने हुकलं याचा राग मनात ठेऊन संबंधित बॅट्समनने कॅच घेणाऱ्या फिल्डरला बॅटने बडवलं.
बॅट्समनच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा
बॅट्समन संजय पालियाने फिल्डर सचिन पराशर याला बॅटने गंभीर मारहाण केलीय. या मारहाणीत सचिन गंभीर जखमी झालाय. संजयविरोधात पोलिस ठाण्यात खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंद झाला आहे. शनिवारी मेला मैदानावर ही मॅच सुरु असतानाचा हा प्रकार आहे, अशी माहिती ग्वाल्हेरचे पोलीस अधिक्षक रामनरेश पचौरी यांनी दिली आहे.
बॅट्समन फरार
सचिन पराशरने जेव्हा सचिन पालियाचा 49 रन्सवर कॅच घेतला, तेव्हा सचिन रागाने लालबुंद झाला होता. त्याचं अर्धशतक केवळ एका रन्सने हुकलं होतं. हाच राग मनात ठेऊन तो सचिनजवळ गेला आणि त्याला बॅटने बडवायलाा सुरुवात केली. मैदानात असलेल्या इतर फिल्डर्सने त्याला अडविण्याचा प्रयत्न केला. पण त्याने कुणाचंच ऐकलं नाही.
संजय पालियाने सचिन पराशर याला एवढी मारहाण केलीय, की तो आणखी बेशुद्ध आहे. उपचारांसाठी त्याला ग्वाल्हेरच्या सरकारी रुग्णालयांत दाखल केलं गेलं आहे. डॉक्टरांच्या निगराणाखाली त्याच्यावर पुढील उपचार सुरु आहे. पण पोलिसांच्या भीतीने बॅट्समन सचिन पालिया फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
(Out for 49 runs the batsman hit the fielder with the bat In MP Gwalior)
हे ही वाचा :
IPL 2021 | आतापर्यंत 3 खेळाडूंना कोरोना, बीसीसीआय ‘हे’ मोठं पाऊल उचलण्याची शक्यता
IPl 2021 : विराट कोहलीचा RCB संघ यंदा प्लेऑफ गाठणार नाही; ‘या’ माजी खेळाडूची भविष्यवाणी
Covid-19 : IPL सामने मुंबईबाहेर नेण्याच्या हालचाली, BCCI मोठा निर्णय घेणार?