‘एक दिवस आम्ही दोघं आकाशात एकत्र फुटबॉल खेळू’, माजी फुटबॉलपटू पेले यांची मॅरेडोना यांना श्रद्धांजली

दिएगो मॅरेडोना यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवर मॅरेडोना यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत.

‘एक दिवस आम्ही दोघं आकाशात एकत्र फुटबॉल खेळू’, माजी फुटबॉलपटू पेले यांची मॅरेडोना यांना श्रद्धांजली
Follow us
| Updated on: Nov 26, 2020 | 7:04 AM

मुंबई : जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना (Diego Maradona) यांचे बुधवारी रात्री हदयविकाराचा झटक्याने निधन झाले. ते 60 वर्षांचे होते. हदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच मॅरेडोना यांची ब्रेन सर्जरी झाली होती. यावेळी त्यांच्या मेंदूत झालेल्या रक्ताच्या गाठी हटवण्यात आल्या होत्या. मॅरेडोना यांना दोन आठवड्यांपूर्वीही ह्रदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज त्यांना राहत्या घरी पुन्हा ह्रदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. (Pele mourns Diego Maradona death says one day we will kick a football together in the sky above)

मॅरेडोना यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवर मॅरेडोना यांना सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली वाहत आहेत. मॅरेडोना यांचे चांगले मित्र असलेले आणि विश्वविख्यात फुटबॉलपटू पेले (Pele) यांनीदेखील सोशल मीडियावरुन आपल्या मित्राच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहिली आहे. पेले यांनी एक ट्विट केलं आहे, त्यात म्हटलं आहे की, “ही खूप दुर्दैवी बातमी आहे. आज मी माझा एक चांगला मित्र आणि जगाने एक महान खेळाडू गमावला. त्याच्याबद्दल खूप काही बोलण्यासारखं आहे, सध्या त्याच्या कुटुंबाला बळ मिळो हीच माझी इच्छा आहे. एक दिवस आम्ही दोघेही वर फुटबॉल खेळू”.

मॅरेडोना आणि पेले हे दोघेही त्यांच्या काळातील जगातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलरपैकी एक होते, या दोघांची नेहमीच तुलना केली जायची. दोघांचाही जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. हे चाहते पेले महान आहेत की मॅरेडोना यावर वाद घालायचे, परंतु हे दोन्ही जगविख्यात खेळाडू कधीही मैदानात समोरासमोर आले नाहीत.

दिएगो मॅरेडोना हे फुटबॉल विश्वातील सार्वकालिन महान खेळाडुंपैकी एक होते. दिएगो मॅरेडोना यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी व्यावसायिक फुटबॉलविश्वात पदार्पण केले. यानंतर अल्पावधीतच त्यांची गणना जगातील लोकप्रिय फुटबॉलपटूंमध्ये होऊ लागली होती.

दिएगो मॅरेडोना यांनी आपल्या कौशल्याने फुटबॉलविश्वात अर्जेंटिनाच्या संघाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्यांनी चार विश्वचषक स्पर्धांमध्ये अर्जेंटिनाच्या संघाचे प्रतिनिधित्व केले होते. 1986 मध्ये दिएगो मॅरेडोना यांच्या नेतृत्त्वाखाली अर्जेंटिनाच्या संघाने पश्चिम जर्मनीचा पराभव करत दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला होता. याशिवाय, बार्सिलोना आणि नेपोली या क्लब्समधूनही ते व्यावसायिक फुटबॉल खेळले होते. मॅरेडोना यांनी नेपोली क्लबला दोनवेळा Serie A हा किताब जिंकवून दिला होता. त्यांनी 91 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 34 गोल्स केले होते.

फुटबॉलविश्वात अनेक नव्या खेळाडुंसाठी मॅरेडोना हे आदर्श होते. त्यांना फिफाचा प्लेअर ऑफ दी सेंचुरी हा पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी इंग्लंडविरुद्ध केलेला गोल ‘हॅड ऑफ गॉड’ म्हणून ओळखला जातो. तर त्याच सामन्यात सहा खेळाडूंच्या मधून चेंडू बाहेर काडून केलेल्या गोलला ‘द गोल ऑफ द सेंचुरी’ असे म्हटले जाते.

दिएगो मॅरेडोना मैदानाबाहेरही अनेक कारणांमुळे गाजले. 1991 साली डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळल्यानंतर मॅरेडोना यांना 15 महिन्यांसाठी निलंबित करण्यात आले होते. २००८ मध्ये ते अर्जेंटिनाच्या राष्ट्रीय संघाचे प्रशिक्षक झाले होते.

संबंधित बातमी

हँड ऑफ गॉड स्टार दिएगो मॅरेोडोना काळाच्या पडद्याआड

(Pele mourns Diego Maradona death says one day we will kick a football together in the sky above)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.