AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहित-धवन बाहेर, राहुलवर मधल्या फळीची जबाबदारी, मग सलामीला कोण? कोहली म्हणतो…

टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतून (India vs New Zealand ODI ) बाहेर पडला आहे.

रोहित-धवन बाहेर, राहुलवर मधल्या फळीची जबाबदारी, मग सलामीला कोण? कोहली म्हणतो...
| Updated on: Feb 04, 2020 | 3:00 PM
Share

हॅमिल्टन : टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्मा दुखापतीमुळे न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेतून (India vs New Zealand ODI ) बाहेर पडला आहे. त्याआधी शिखर धवनची दुखापतीमुळे या दौऱ्यासाठी (India vs New Zealand ODI ) निवडच झाली नव्हती. त्यामुळे धवनऐवजी भारतीय संघात मुंबईकर पृथ्वी शॉला (Prithvi Shaw)संधी देण्यात आली आहे. तर रोहित शर्माच्या जागी मयांक अग्रवालची निवड करण्यात आली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेत पृथ्वी शॉ- मयांक अग्रवाल हे दोघे सलामीला उतरतील, अशी घोषणा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने केली. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वन डे मालिकेला उद्यापासून (5 फेब्रुवारी) सुरुवात होत आहे.

पृथ्वी शॉची प्लेईंग इलेव्हनमध्ये  निवड केली जाणार आहेच, शिवाय तो सलामीला उतरेल, असं कोहली म्हणाला. याशिवाय जबरदस्त फॉर्ममध्ये असलेले के एल राहुल मधल्या फळीची जबाबदारी सांभाळेल. राहुल पाचव्या स्थानावर फलंदाजी करेल, असंही कोहलीने सांगितलं.

कोहली म्हणाला, “वन डे मालिकेतून रोहित शर्मा बाहेर पडणे दुर्दैवी आहे. वन डेमध्ये पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल डावाची सुरुवात करतील. तर लोकेश राहुल मधली फळी सांभाळेल. त्याने विकेटकीपिंगसह मधल्या फळीत पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी अशी आमची इच्छा आहे”

कसोटी संघाची घोषणा

न्यूझीलंडविरुद्धच्या 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आज भारतीय संघाची निवड करण्यात आली. टीम इंडियाचा दुखापतग्रस्त सलामीवीर रोहित शर्माच्या जागी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता होती (Rohit Sharma Replacement Found). कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात युवा फलंदाज शुभमन गिलला संघात संधी देण्यात आली आहे, तर वनडे मालिकेत मयांक अग्रवालची वर्णी लागली आहे. रोहित शर्माला दुखापतीमुळे न्यूझीलंड दौऱ्यातून माघार घ्यावी लागली. धवनपाठोपाठ ‘हिटमॅन’ही मालिकेतून ‘आऊट’ झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला होता.

 टी 20 मालिकेत व्हाईट वॉश

दरम्यान, भारताने न्यूझीलंडला 5 सामन्यांच्या मालिकेत व्हाईट वॉश दिला. पाचही सामन्यात पराभव झाल्याने, न्यूझीलंडचा आत्मविश्वास खचला आहे. तर मोठ्या विजयाने भारतीय संघाचं मनोबल उंचावलं आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.