Prithvi Shaw : पृथ्वी शॉ हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट, आणखी एक व्हिडीओ समोर
पृथ्वी शॉ हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. या प्रकरणातील आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.
मुंबई : भारताचा युवा खेळाडू पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. सेल्फी घेण्याच्या वादातून त्याच्यावर काही लोकांनी हल्ला केल्याची माहिती समोर आली होती. पृथ्वीने सेल्फी कढण्यासाठी नकार दिल्याने भडकलेल्या चाहत्यांनीच तो बसलेल्या कारवर दगडफेक केली होती. पोलिसांनी या प्रकरणामध्ये 8 जणांवर गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणात आणखी एक ट्विस्ट आला असून एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये शॉ तरूणीसोबत बाचाबाची करत असल्याचं दिसत आहे. संबंधित तरूणीने आरोप केला आहे की शॉनेच तिच्यावर आणि तिच्या मित्रांवर हल्ला केला.
नक्की काय आहे प्रकरण?
पृथ्वी शॉ त्याचे मित्र आशिष आणि ब्रिजेशसोबत एका हॉटेलमध्ये डिनरसाठी गेला होता. जिथे सेल्फीवरून काही मुला-मुलींसोबत त्याचं भांडण झालं. शॉने आधी सेल्फी दिला मात्र परत सेल्फी घ्यायला आल्यावर त्याने आपण जेवण करत असल्याचं सांगत सेल्फी दिला नाही. शॉने नकार दिल्यामुळे तिथं भांडण झालं.
हॉटेलमधील मॅनेजरने सेल्फी घेण्यासाठी आलेल्यांना बाहेर जाण्यास सांगितलं. जेवण झाल्यानंतर शॉ आणि त्याचे मित्र बाहेर गेले तेव्हा काही लोक आधीच बेसबॉलची बॅट घेऊन उभे होते. त्यानंतर त्यांनी आमचा पाठलाग केला आणि गाडीची काच फोडली. पेट्रोल पंपाजवळ त्यांची गाडी थांबवली. हल्ला करणाऱ्यांनी अशी धमकी दिली की जर 50 हजार दिले नाहीतर खोटा गुन्हा दाखल करू, याबाबतची माहिती आशिषने पोलिसांना दिली.
Instagram model #SapnaGill and her men attacked #PrithviShaw‘s friend’s car with baseball bat after Shaw refused to take selfies with her. pic.twitter.com/PGZzlA0sE1
— Vishwajit Patil (@_VishwajitPatil) February 16, 2023
दरम्यान, पोलिसांनी हल्ला करणाऱ्या मुलीला अटक केली आहे. सना गिल आणि शोभित ठाकूरसह 8 जणांना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समजत आहे.
याआधीही शॉ अनेकवेळा काही प्रकरणांमध्ये अडकला आहे. 14 फेब्रुवारीला पृथ्वी शॉ च्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्री निधी तपाडियासोबतचा एक फोटो शेअर करण्यात आला. निधीचा पृथ्वीने पत्नी असा उल्लेख केला. काही मिनिटात त्याने हा फोटो डिलीट केला. कोणीतरी आपला फोटो एडिट केलाय, असं पृथ्वी शॉ ने स्पष्टीकरण देताना सांगितलं. इन्स्टाग्रामवर पोस्ट न केलेल्या गोष्टी दाखवल्या जातायत असं त्याने सांगितंल. अशा कुठल्याही गोष्टी सत्य मानू नका, असं त्याने लोकांना आवाहन केलं.