मुलाच्या दहाव्या बर्थडेला अनुप कुमारने कबड्डी सोडली, कायमची!

मुंबई: भारताच्या मातीतला खेळ अशी ओळख असलेल्या कबड्डीकडे नव्या-जुन्या पिढीला पुन्हा आकर्षून घेतलं ते प्रो कबड्डीने. याच प्रो कबड्डीतील सर्वांच्या लक्षात राहणारं एकमेव नाव म्हणजे अनुप कुमार. पूर्वीचा यू मुंबाचा आणि सध्याचा जयपूर पिंक पँथर संघाचा कर्णधार असलेल्या अनुप कुमारने कबड्डीतून निवृत्ती जाहीर केली आहे. शांत आणि संयमी, पण तितकाच हुशार खेळाडू म्हणून अनुप कुमार […]

मुलाच्या दहाव्या बर्थडेला अनुप कुमारने कबड्डी सोडली, कायमची!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:49 PM

मुंबई: भारताच्या मातीतला खेळ अशी ओळख असलेल्या कबड्डीकडे नव्या-जुन्या पिढीला पुन्हा आकर्षून घेतलं ते प्रो कबड्डीने. याच प्रो कबड्डीतील सर्वांच्या लक्षात राहणारं एकमेव नाव म्हणजे अनुप कुमार. पूर्वीचा यू मुंबाचा आणि सध्याचा जयपूर पिंक पँथर संघाचा कर्णधार असलेल्या अनुप कुमारने कबड्डीतून निवृत्ती जाहीर केली आहे. शांत आणि संयमी, पण तितकाच हुशार खेळाडू म्हणून अनुप कुमार ओळखला जात असे. मात्र अनुप कुमारने अचानक निवृत्ती जाहीर केल्याने चाहत्यांना धक्का बसला आहे. 35 वर्षीय अनुपमने बुधवारी मुलाच्या दहाव्या वाढदिनी निवृत्ती जाहीर केली.

अर्जुन पुरस्कार विजेता अनुप कुमारने 2006 मध्ये दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यातून करिअरला सुरुवात केली होती. 2010 आणि 2014 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय कबड्डी संघाने सुवर्ण पदक जिंकलं होतं. त्या संघात अनुप कुमारही खेळला होता. आशियाई क्रीडा स्पर्धे 2014 मध्ये अनुप कुमार भारतीय संघाचा कर्णधार होता.

अनुप कुमारच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने 2016 मध्ये विश्वचषक जिंकला होता. तर प्रो कबड्डी लीगच्या दुसऱ्या सत्रात यू मुंबाने अनुपच्याच नेतृत्त्वात विजेतपद पटकावलं होतं. बोनसचा बादशाह अशी त्याची ओळख होती. याच प्रो कबड्डी स्पर्धेत त्याने निवृत्तीची घोषणा केली.  अनुप कुमार प्रो कबड्डीचे सहा हंगाम खेळला.

अनुप म्हणाला, “मी जेव्हा कबड्डी खेळणं सुरु केलं, तेव्हा ती माझी आवड होती. मात्र कबड्डीच पुढे माझ्या आयुष्याचा हिस्सा झाली. देशाचं प्रतिनिधीत्व करुन सुवर्णपदक पटकावणं माझं स्वप्न होतं. मी त्या भाग्यवान लोकांमध्ये आहे, ज्यांचं स्वप्न साकार झालं आहे”.

आज प्रो कबड्डी लीगसह खेळ खूपच पुढे गेला आहे, या यात्रेचा एक भाग होता आलं याचा मला अभिमान आहे. हा मंच माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा पैलू ठरला. त्यामुळेच मी हाच मंच निवृत्तीची घोषणा करण्यासाठी निवडला. योगायोगाने आज माझ्या मुलाचा दहावा वाढदिवस आहे, त्यामुळे हा दिवसही माझ्यासाठी अविस्मरणीय ठरला आहे.

अर्जुन पुरस्कार विजेता अनुप कुमारची हरियाणा सरकारने पोलीस उपायुक्त  म्हणून नियुक्ती केली आहे.

वैयक्तिक आयुष्य

अनुप कुमारचा जन्म 20 नोव्हेंबर 1983 रोजी हरियाणातील पालरा या गावात झाला. रणसिंग यादव आणि बल्लो देवी असं त्याच्या आई वडिलांचं नाव आहे. शालेय शिक्षणापासूनच अनुपला कबड्डीची आवड होती. एप्रिल 2005 मध्ये अनुप कुमार सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल म्हणून रुजू झाला. कबड्डीतील कौशल्यामुळे त्याची भारतीय संघात निवड झाली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.