मोहम्मद शमीचा ‘तो’ चेंडू पाहून पुजारा आणि कोहली आश्चर्यचकीत, नेमकं काय घडलं मैदानात Watch Video
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यात मोहम्मद शमीनं टाकलेल्या चेंडूमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. इतकंच काय तर स्लीपला उभे असलेल्या चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहलीलाही नेमकं काय झालं कळेना. पंचाचा निर्णयामुळे प्रेक्षक वर्गही संभ्रमात पडला.
दिल्ली : बॉर्डर गावसकर चषकातील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया दुसरा कसोटी सामना दिल्लीच्या अरुण जेटली मैदानात सुरु आहे. पहिला कसोटी सामना जिंकत भारतानं 1-0 ने आघाडी घेतली आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात कमबॅक करण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने कंबर कसली आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजानं आश्वासक सुरुवात करुन दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद 263 धावा केल्या. मोहम्मद शमीनं 4, रविंद्रन अश्विननं 3 आणि रविंद्र जडेजानं 3 गडी बाद केले. दुसरीकडे, मोहम्मद शमीच्या एका चेंडूमुळे चेतेश्वर पुजार आणि विराट कोहलीला आश्चर्याचा धक्काच बसला. कारण त्याने टाकलेला चेंडू कोणालाही कळलाच नाही. इतकंच काय मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांचीही उत्सुकता ताणली गेली. पंचांनी तो चेंडू नो दिल्याने सर्वांनीच आश्चर्य व्यक्त केलं. पण आयसीसीच्या नियमानुसार पंचांनी दिलेला निर्णय योग्यच आहे.
मैदानात नेमकं काय घडलं?
कर्णधार रोहित शर्मानं शमीकडे तिसरं षटक सोपवलं. या षटकातला पहिला चेंडू टाकताना शमीचा पाय घसरला आणि खेळपट्टीपासून लांब पडला. विकेटकीपर श्रीकर भरतनं हा चेंडू पकडला पण स्लीपला उभे असलेले चेतेश्वर पुजारा आणि कोहली एकमेकांकडे पाहू लागले.कारण पंचांनी हा चेंडू वाईट देण्याऐवजी नो दिला होता. पण हा चेंडू नो की वाईड असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला.आयसीसीच्या नियम 21.13 नुसार जर चेंडू खेळपट्टीच्या बाहेर डायरेक्ट पडला तर तो नो बॉल दिला जातो.
— Anna 24GhanteChaukanna (@Anna24GhanteCh2) February 17, 2023
ऑस्ट्रेलियाचा डाव
डेविड वॉर्नर आणि उस्मान ख्वाजानं संघाला आश्वासक सुरुवात करून दिली. पहिल्या गड्यासाठी दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर डेविड वॉर्नर तंबूत परतला. त्याने 44 चेंडूत 15 धावांची खेळी केली. त्यानंतर ख्वाजा साथ देण्यासाठी मार्नस लाबुसचेन मैदानात उतरला. दोघांनी 41 धावांची भागीदारी केली.मार्नसला अश्विननं त्याला तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर आलेला स्मिथ झटपट बाद झाला. ट्रेविड हेड 12 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर उस्मान ख्वाजा 81 धावांवर असताना रविंद्र जडेजाने त्याला तंबूत धाडलं. अलेक्स करे मैदानात आला तसाच परत गेला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. मात्र हँडस्कॉम्ब आणि पॅट कमिन्स जोडीनं चांगली कामगिरी केली. दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. रविंद्र जडेजाने कमिन्सला पायचीत करत ही भागीदारी फोडली. टोड मर्फीही आला तसाच परत गेला. नाथन लायन (10) आणि मॅथ्यु कुहनेमन (6) धावा करत बाद झाले.
टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, श्रीकर भरत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर. अश्विन, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रेविस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), टॉड मर्फी, नाथन लायन आणि मॅथ्यू कुहनेमन.