KL Rahul hospitalized: पंजाबचा कॅप्टन के. एल. राहुल रुग्णालयात, आयपीएलमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह

KL Rahul hospitalized:पंजाबचा कॅप्टन के एल राहुल पोटात दुखत असल्यानं रुग्णालयात दाखल झाला आहे.

KL Rahul hospitalized: पंजाबचा कॅप्टन के. एल. राहुल रुग्णालयात, आयपीएलमध्ये खेळण्यावर प्रश्नचिन्ह
के एल राहुल
Follow us
| Updated on: May 02, 2021 | 7:03 PM

नवी दिल्ली: पंजाब किंग्जचा कॅप्टन के. एल. राहुल (KL Rahul) याला पोटात दुखू लागल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. के. एल. राहुल याच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. उर्वरित सामन्यांमध्ये के. एल. राहुल पंजाबसाठी खेळू शकेल की नाही याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.  (Punjab kings skipper kl Rahul hospitalised after getting diagnosed with acute appendicitis to surgery tweet by team)

पंजाब किंग्जचं ट्विट

काल रात्री के.एल. राहुलच्या पोटात वेदना सुरु झाल्या होत्या. प्राथमिक वैद्यकीय उपचार करुनही वेदना थांबत नव्हत्या. यानंतर तातडीनं पुढील तपासणी केली असता त्याला अ‌ॅपेंडिक्स असल्याचं समोर आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं केल राहुलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आता राहुलवर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती आहे.

के.एल. राहुलच्या सर्वाधिक धावा

आयपीएलच्या 14 व्या हंगामात राहुलनं सर्वाधिक 331 धावा केल्या आहेत. त्यानं सात मॅचेसमध्ये 66.20 च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. राहुलच्या जागेवर कर्णधार म्हणून कोण काम करणार याविषयी संघ व्यवस्थापनानं कोणतीही घोषणा केली नाही. ख्रिस गेल किंवा मयंक अग्रवाल पंजाब किंग्जचा कर्णधार असू शकतो.

पंजाब किंग्ज पाचव्या स्थानी

पंजाब किंग्ज सध्या आयपीएलच्या पॉईंटटेबलमध्ये 5 व्या स्थानावर आहे. पंजाब किंग्जनं आतापर्यंत 7 सामने खेळले आहेत. त्यापैकी 3 मॅचमध्ये पंजाबचा विजय झाला आहे. तर, चार सामन्यांमध्ये पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. पंजाबनं गेल्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूचा पराभव केला आहे.

प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी राहुलच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी म्हणून, ट्विट केलं आहे.

संबंधित बातम्या: 

PBKS vs DC Live Score, IPL 2021 | पंजाब किंग्ससमोर दिल्ली कॅपिट्ल्सचं मजबूत आव्हान? कोण मारणार मैदान?

RR vs SRH Live Score, IPL 2021 | हैदराबादला मोठा झटका, कर्णधार केन विलियमनस आऊट

(Punjab kings skipper kl Rahul hospitalised after getting diagnosed with acute appendicitis to surgery tweet by team)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.