या अवाढव्य देशाच्या हृदयाचे ठोके थांबवण्याची ताकद… सचिन तेंडुलकरला राज ठाकरेंकडून काय शुभेच्छा?

HBD Sachin Tendulkar | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त जगभरातून शुभेच्छांना वर्षाव होतोय. राज ठाकरे यांनी तेंडुलकरला ट्विटरच्या माध्यमातून विशेष शुभेच्छा दिल्यात.

या अवाढव्य देशाच्या हृदयाचे ठोके थांबवण्याची ताकद... सचिन तेंडुलकरला राज ठाकरेंकडून काय शुभेच्छा?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 24, 2023 | 5:22 PM

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) आणि सचिन तेंडुलकर (Sachin Tendukar) यांचं मैत्र सर्वांना परिचित आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने आज वयाची पंचविशी पूर्ण केली. यानिमित्त केवळ राज्यातूनच नव्हे तर देश-विदेशातून सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील सचिन तेंडुलकरला शुभेच्छा दिल्यात. सचिन, तू पन्नाशी गाठलीस. आता शतकदेखील नक्की गाठशील, अशी इच्छा आणि अपेक्षा असल्याचं ट्विट राज ठाकरे यांनी केलंय.

राज ठाकरे यांचं ट्विट काय?

क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरची ख्याती राज ठाकरे यांनी नेमक्या शब्दात वर्णन केली. त्यांनी लिहिलंय, ‘ सचिन तेंडुलकरने आज अवघी पन्नाशी पूर्ण केली. ह्या अवाढव्य देशाच्या हृदयाचे ठोके एकाच क्षणाला थांबवायची किंवा एकत्र आख्ख्या देशाने ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, अशी ताकद ज्या माणसाने निर्माण केली तो आपला सचिन. आकाशाला गवसणी घालणारं अफाट असं यश मिळवून देखील जमिनीला घट्ट पाय ठेवणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. सचिनने शतक ठोकलंच पाहिजे अशी कायमच इच्छा किंवा अपेक्षा असते, ही इच्छा/अपेक्षा.. तू पूर्ण करशीलच.

ऑस्ट्रेलियाकडून विशेष गिफ्ट

सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्त ऑस्ट्रेलियातूनही विशेष गिफ्ट मिळालंय. सचिनचा ५० वाढदिवस आणि ब्रायन लाराच्या सिडने क्रिकेट ग्राउंडवरील २७७ धावांच्या इनिंगला ३० वर्षे पूर्ण झालीत. यानिमित्ताने सिडने क्रिकेट ग्राउंडच्या गेटला सचिन तेंडुलकर-ब्रायन लारा हे नाव देण्यात आलंय. या क्रिकेट ग्राउंडवर परदेशी क्रिकेटर्स लारा-तेंडुलकर गेटमधून प्रवेश करतील. तर ऑस्ट्रेलियन टीम डॉन ब्रॅडमन गेटमधून मैदानात प्रवेश करेल, असे नियोजन करण्यात आले आहे.

सचिन तेंडुलकरचा जन्म मुंबईतील दादर येथे २४ एप्रिल १९७३ रोजी झाला. क्रिकेट जगात डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा हा माजी क्रिकेटपटू आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतकांचे शतक ठोकखणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे. २० नोव्हेंबर २००९ रोजी त्याने कारकीर्दीतील ३० हजार आंतराराष्ट्रीय धावांचा टप्पा पूर्ण केला.

सचिन तेंडुलकरला पद्मविभूषण, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार तसेच भारताचा सर्वोच्च भारतरत्न हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याने यंदाच्या आयपीएल सामन्यातून जोरदार प्रदर्शन केलंय.

जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.