दरीत पडलेले माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला

शेखर गवळी हे नाशिकच्या इगतपुरी परिसरात ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यावेळी पाय घसरुन ते दरीत कोसळले होते

दरीत पडलेले माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला
Follow us
| Updated on: Sep 02, 2020 | 10:04 AM

नाशिक : ट्रेकिंगदरम्यान पाय घसरुन दरीत पडलेले माजी रणजीपटू शेखर गवळी यांचा मृतदेह सापडला आहे. रेस्क्यू टीमला बुधवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास दरीत त्यांचा मृतदेह आढळला. (Ranji Cricketer Shekhar Gawli found dead in Igatpuri Valley)

शेखर गवळी यांचा शोध घेण्याचे प्रयत्न मंगळवार संध्याकाळपासून सुरु होते. मात्र अंधार झाल्याने रेस्क्यू ऑपरेशन थांबवले. बुधवारी सकाळी तीन तासाच्या शोधानंतर गवळी यांचे पार्थिव हाती लागल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

शेखर गवळी हे महाराष्ट्र क्रिकेट संघाचे प्रशिक्षक आहेत. या दुर्घटनेने क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.

नेमकं काय घडलं?

शेखर गवळी हे नाशिकच्या इगतपुरी परिसरात काही सहकाऱ्यांसोबत ट्रेकिंगसाठी गेले होते. त्यावेळी पाय घसरुन ते अचानक पडले आणि थेट दरीत कोसळले. मंगळवारी (1 सप्टेंबर) संध्याकाळी 5.30 वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली होती.

गवळी यांच्या सहकाऱ्यांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला. तसेच आपत्कालीन यंत्रणाही बचाव मोहिमेत सहभागी झाली. मात्र त्यांचा शोध लागत नव्हता.

संबंधित बातमी :

माजी रणजी क्रिकेटपटू शेखर गवळींचा ट्रेकिंगदरम्यान अपघात, पाय घसरुन दरीत पडले

(Ranji Cricketer Shekhar Gawli found dead in Igatpuri Valley)

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.