AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रणजी खेळाडू ‘कोरोना’विरुद्ध मैदानात, 91 क्रिकेटपटूंचे रक्तदान

वसई-विरारमध्ये होणाऱ्या रक्तदान शिबिरात थेट रणजी खेळाडूंनी सहभाग घेत कोरोनारुग्णांसाठी रक्तदान केलं आहे.

रणजी खेळाडू 'कोरोना'विरुद्ध मैदानात, 91 क्रिकेटपटूंचे रक्तदान
| Updated on: Jun 08, 2020 | 3:11 PM
Share

मुंबई : कोरोनाशी सुरु असलेला सामना जिंकण्यासाठी (Ranji Cricketers Donate Blood) वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. या सामन्यातील प्रत्येक खेळाडू आपली भूमिका ओळखून ती चोख बजावत आहेत. या सामन्याच्या क्रीडांगणाची व्याप्ती रस्त्यापासून घरापर्यंत आहे. पण, आता या सामन्यात खऱ्याखुऱ्या खेळाडूंनीही सक्रीय सहभाग घेतला आहे. वसई-विरारमध्ये होणाऱ्या रक्तदान शिबिरात थेट रणजी खेळाडूंनी सहभाग घेत कोरोनारुग्णांसाठी रक्तदान केलं आहे. त्यांच्या सहभागामुळे नागरिकांमध्येही उत्साहाचं वातावरण असून भरभूर प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत 91 खेळाडूंनी रक्तदान (Ranji Cricketers Donate Blood) केलं आहे.

विवा महाविद्यालय, साईनाथ स्पोर्ट्स क्लब, अवर्स क्रिकेट क्लब यांनी जे. जे. रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने वसई-विरारमध्ये रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं. साईनाथ स्पोर्ट्स क्लब आणि अवर्स क्रिकेट क्लब या दोन्ही संस्था मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहेत. कोरोनाच्या महामारीमुळे सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा असून तो भरुन काढण्यासाठीच हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं होतं. यात विवा महाविद्यालयाने पुढाकार घेतला.

या रक्तदान शिबिरात वसई-विरार टप्प्यातील 90 पेक्षा जास्त खेळाडूंनी आपलं योगदान दिलं. यात विनायक भोईर आणि रॉयस्टन डियाझ या रणजी खेळाडूंचाही समावेश आहे. त्याशिवाय 250 पेक्षा जास्त कुटुंबांनी पुढे येत आपला वाटा उचचला आहे. विवा महाविद्यालयाजवळ या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. रक्तदान शिबीर आयोजित करताना आयोजकांनी सोशल डिस्टंसिंगची पुरेपूर काळजी घेतल्याचं रक्तदात्यांनी सांगितलं.

खेळाडूंबरोबरच विवा महाविद्यालयाचे खजिनदार शिखर ठाकूर, स्थानिक आमदार क्षितीज ठाकूर यांनीही रक्तदान केलं. त्याशिवाय, मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनीही या शिबिरात सक्रीय सहभाग घेतला. ‘कोरोनाच्या या कठीण प्रसंगात सगळेच आपापल्या परीने मदत करत आहेत. अशा वेळी वसई-विरारमधील MCAशी संलग्न असलेल्या या क्लबनी पुढाकार घेत या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं, याचं आम्हाला कौतुक आहे,’ असं मत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष पंकज ठाकूर यांनी व्यक्त केलं (Ranji Cricketers Donate Blood).

रक्तदानासाठी आम्हाला मिळालेला प्रतिसाद खरंच खूप उत्साहवर्धक होता. कोरोनाच्या भीतीमुळे लोक बाहेर पडतील की नाही, याबद्दल आम्हाला शंका होती. पण वसई-विरारकरांनी ही शंका खोटी ठरवली. सगळ्या वयोगटातील खेळाडूंनीच नाही, तर त्यांच्या कुटुंबियांनीही रक्तदान केलं. MCAशी संलग्न असलेले क्लब अशा उपक्रमांमध्येही हिरहिरीने पुढाकार घेत आहेत, ही बाब आमच्यासाठी खरंच अभिमानाची आहे, अशी प्रतिक्रिया MCAचे अपेक्स कौन्सिल मेम्बर अजिंक्य नाईक यांनी व्यक्त केली.

जेजे रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात विवा महाविद्यालयाच्या विश्वस्तांनीही सहभाग घेतला. 91 खेळाडूंसह अनेक क्रिकेटप्रेमीनीं सहभाग घेत 250 पेक्षा जास्त बाटल्या रक्त या शिबिराच्या माध्यमातून गोळा करण्यात यश आलं. हा आकडा मागणीच्या तुलनेत छोटा असला, तरी कोरोनाविरोधी लढ्यात वसई-विरारकरांचं हे योगदान आहे, अशी प्रतिक्रिया आमदार क्षितीज ठाकूर (Ranji Cricketers Donate Blood) यांनी व्यक्त केली.

संबंधित बातम्या :

पाकचा माजी क्रिकेटपटू अब्दुल्ल रझाकचे भारतीय क्रिकेट संघावर गंभीर आरोप

ट्विटरवर #युवराज_सिंह_माफी_मांगो का ट्रेंड होतंय?

ऑस्ट्रेलियाने रणशिंग फुंकले, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर

“बाप बाप होता है” वगैरे घडलंच नाही, सेहवाग खोटारडा : अख्तर

BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...