Rashid Khan: राशिद खानने सांगितले, टीम इंडियाचा पुढचा कर्णधार कसा असावा
टीम इंडियासाठी हा कर्णधार योग्य असेल, राशिद खानच्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा
मुंबई : टीम इंडियाची (IND) कामगिरी मागच्या काही दिवसांपासून चांगली होत नसल्यामुळे बीसीसीआय (BCCI) मोठा निर्णय घेण्याच्या विचारात आहे. टीम इंडियामध्ये चांगले खेळाडू असताना सुध्दा टीम इंडियाचा वारंवार पराभव होत आहे. विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्यानंतर युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार असल्याचं सुचक वक्तव्य बीसीसीआयकडून करण्यात आलं होतं. त्यानुसार निवड समिती पहिल्यांदा बरखास्त करण्यात आली. त्यानंतर हार्दीक पांड्याच्या (Hardik Padhya)नेतृत्वात टीम इंडिया न्यूझिलंड दौऱ्यासाठी पाठवण्यात आली होती.
अफगाणिस्तानचा स्टार गोलंदाज राशिद खानने सुद्धा टीम इंडियाचा कर्णधार कोण असावा याबाबत वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्याची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे. रशिद खान म्हणतोय की, हार्दीक पांड्याकडे सध्या कर्णधारपद संभाळण्याची ताकद आहे. त्यामुळे त्याला ते मिळावे अशी माझी इच्छा आहे.
गेल्यावर्षी हार्दीक पांड्याने आयपीएलमध्ये गुजरात टीमचं नेतृत्व केलं. पहिल्यांदा कर्णधारपद मिळाल्यानंतर हार्दीकने टीमला आयपीएलचा किताब जिंकून दिला. त्यामुळे त्यांच्याकडे कर्णधारपद स्विकारायची ताकद पांड्याने असल्याचे रशिद खानने स्पष्टं केलं आहे.
न्यूझिलंड दौऱ्यात हार्दीक पांड्याने T20 मालिकेसाठी कर्णधार पदं देण्यात आलं होतं. टीममध्ये युवा खेळाडू असताना सुद्धा टीमने मालिका जिंकली.