Ravindra Jadeja | अखेर रविंद्र जाडेजा या क्रिकेटरची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, या पक्षाकडून आज उमेदवारी दाखल करणार

रविंद्र जाडेजा याची पत्नी आज उमेदवारी अर्ज दाखल करणार, या पक्षाकडून दाखल करणार उमेदवारी

Ravindra Jadeja | अखेर रविंद्र जाडेजा या क्रिकेटरची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात, या पक्षाकडून आज उमेदवारी दाखल करणार
Ravindra Jadeja, rivaba Jadeja Image Credit source: twitter
Follow us
| Updated on: Nov 14, 2022 | 10:59 AM

मुंबई : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या त्याच्या पायाच्या दुखापतीमुळे आराम करीत आहे. जाडेजाच्या पायाला दुखापत असल्यामुळे विश्वचषक स्पर्धेला (T20 World Cup) तो मुकला आहे. जाडेजा त्याच्या सोशल मीडियावर अधिक सक्रीय असतो, त्याचे फॉलोअर्स मिलियममध्ये आहेत. रविद्र जाडेजाची पत्नी रिवाबा (Rivaba Jadeja) निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे. तिला एका पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज रिवाबाचा निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे.

जाडेजाची पत्नी रिवाबा हीला भारतीय जनता पक्षाने गुजरात राज्याच्या जामनगर उत्तरमधून उमेदवारी जाहीर केली आहे. विशेष म्हणजे रिवाबा जाडेजा ही कार्यकर्त्यांसह आज अर्ज दाखल करणार आहे. रविंद्र जाडेजाने सुद्धा पत्नीला जामनगरमधील रहिवाशांनी मदत करावी यासाठी व्हिडीओच्या माध्यमातून आवाहन केले आहे. ज्यावेळी रिवाबा अर्ज दाखल करणार आहेत, त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सुद्धा रविंद्र जाडेजाने केले आहे.

हे सुद्धा वाचा

रविंद्र जाडेजाला आशिया चषका दरम्यान गुडघ्याला दुखापत झाली. दुखापत इतकी गंभीर झाली की, त्याला आशिया चषक स्पर्धा सोडावी लागली. सद्या तो दुखापतीतून बरा होत आहे. त्याने पुन्हा सरावाला सुरुवात केली आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत त्याला संधी देण्यात आली आहे. परंतु त्याचा फिटनेस चांगला असेल तर त्याला खेळण्याची संधी मिळणार आहे.

भाजपच्या अनेक कार्यक्रमांमध्ये रिवाबा याच्या आगोदर दिसली आहे. ती सौराष्ट्रच्या करणी क्षत्रिय सेनेची अध्यक्षा सुद्धा होती. जामनगर येथील भाजप आमदाराने आयोजित केलेल्या श्रीमद भागवत सप्ताहाच्या कार्यक्रमाला रिवाबा उपस्थित राहिली होती. त्यावेळी तिला तिथं विधानसभा निवडणूक लढवणार का ? असं विचारण्यात आलं. रिवाबाने पंतप्रधान आणि भाजपच्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, तर नक्की लढेन असं उत्तर दिलं होतं.

रविंद्र जाडेजाने त्यांच्या ट्विटरवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये तो म्हणतोय की, माझ्या चाहत्यांनो आणि जामनगरवासियांनो तुम्हाला माहिती आहे की, गुजरात विधानसभा निवडणुक जलदगती क्रिकेटप्रमाणे वेगाने सुरु आहे. विशेष म्हणजे माझी पत्नी रिवाबा हीला भारतीय जनता पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे. आज निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यात येणार आहे. त्यामुळे अधिक संख्येने उमेदवारीला अर्ज दाखल करुया, उद्या सकाळी भेटू”. या पद्धतीने रविंद्र जाडजाने पत्नीसाठी आवाहन केले आहे.

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.