IPL 2O20, KXIP vs RCB : कर्णधार विराट कोहलीला दणका, भरावा लागणार 12 लाखांचा दंड

बंगळुरुला पंजाबविरुद्ध गोलंदाजी करताना आवश्यक षटकांची गती राखता आली नाही. | ( RCB Captain Virat Kohli fined Rs 12 lakh )

IPL 2O20, KXIP vs RCB : कर्णधार विराट कोहलीला दणका, भरावा लागणार 12 लाखांचा दंड
Follow us
| Updated on: Sep 25, 2020 | 3:29 PM

दुबई : आयपीएलमधील (IPL 2020) सहावा सामना 24 सप्टेंबरला किंग्ज इलेव्हन पंजाब (Kings Eleven Punjab) विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Banglore) यांच्यात खेळण्यात आला. या सामन्यात बंगळुरुचा 97 धावांनी निराशाजनक पराभव झाला. या पराभवानंतर बंगळुरुच्या कर्णधाराला म्हणजेच विराट कोहलीला (Virat Kohli) आणखी एक झटका लागला आहे. विराट कोहलीला 12 लाखांचा दंड भरावा लागणार आहे. ( RCB Captain Virat Kohli fined Rs 12 lakh )

…म्हणून ठोठावला दंड

विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंजाबविरुद्ध गोलंदाजी करताना बंगळुरुला आवश्यक षटकांची गती राखता आली नाही. या कारणामुळे विराट कोहलीला बंगळुरुचा कर्णधार या नात्याने दंड ठोठावण्यात आला आहे. बोलिंग करताना ठराविक षटकांची गती कायम ठेवावी लागते. हीच गती कायम न राखल्याने विराटला हा दणका बसला आहे.

विराटची निराशाजनक कामगिरी

पंजाबविरुद्धच्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीकडून अनेक चुका झाल्या. पहिली चूक म्हणजे विराटने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सर्वसाधारणपणे कोणताही कर्णधार नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला पसंती देतो.

विराटने नाणेफेक जिंकून पंजाबला फलंदाजी करण्यास भाग पाडले. फंलदाजी करायला आलेल्या पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने (Lokesh Rahul) याचा चांगलाच फायदा घेतला. त्याने 69 चेंडूत नाबाद 132 धावा केल्या. या खेळीच्या जोरावर पंजाबचा या सामन्यात विजय झाला.

राहुलच्या फलंदाजीदरम्यान कर्णधार विराटने केलेली चूक बंगळुरुला चांगलीच महागात पडली. चक्क विराटने केएल राहुलच्या दोन कॅच सोडल्या. विराटने पहिली कॅच सामन्याच्या 17 ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर सोडली. तेव्हा राहुल 83 धावांवर होता. विराटने राहुलची दुसरी कॅच पुढील म्हणजेच 18 व्या ओव्हरमध्ये सोडली. यावेळेस राहुल 89 धावांवर होता. विराटकडून मिळालेल्या या 2 जीवनदानाचा राहुलने चांगलाच लाभ घेतला. त्याने शतक ठोकलं. राहुलने नाबाद 132 धावांची खेळी केली.

विराटला बॅटिंगनेही काही चमत्कार दाखवता आला नाही. विराट अवघी 1 धाव करुन बाद झाला. पंजाबविरुद्धच्या या सामन्यात विराट फिल्डिंग, बॅटिंग आणि नेतृत्वात अशा तीनही आघाडींवर अयशस्वी ठरला.

पराभवानंतर विराटची प्रतिक्रिया

पराभवानंतर विराट म्हणाला, “मी कर्णधार या नात्याने या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो. राहुलच्या दोन कॅच सोडणं आम्हाला महागात पडलं. राहुलने या संधीचा फायदा घेतला. त्याने शतकच ठोकलं नाही, तर दमदार खेळी करत पंजाबची धावसंख्या 200 पार पोहचवली. यामुळे विजयी लक्षात 30-40 धावांची वाढ झाल्याचं विराटने कबुल केलं. पंजाबला 180 धावांपर्यंतच आम्ही रोखलं असतं, तर आमच्यावर बॅटिंगदरम्यान मोठे फटके मारण्याचा दबाव आला नसता, असंही विराट म्हणाला. क्रिकेट म्हटलं की चढउतार असतातच. ही वेळ पुढे जाण्याची आहे, असंही विराटने नमूद केलं.

संबंधित बातम्या :

IPL 2020, KXIP vs RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या पराभवाची तीन प्रमुख कारणं

कॉमेंट्रीत विराट-अनुष्काविषयी आक्षेपार्ह टिप्पणी, सुनील गावस्करांवर चाहते बरसले

Virat Kohli | विराटच्या घरी नवा पाहुणा येणार, अनुष्काने दिली ‘गुड न्यूज’

( RCB Captain Virat Kohli fined Rs 12 lakh )

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.