Ishant Sharma | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदलेल्या नियमावर इशांत आणि चहलची नाराजी

जर आम्ही लाल चेंडू चमकवला नाही, तर तो स्विंग होणार नाही. जर स्विंग झाला नाही तर फलंदाजांसाठी ते फायद्याचे ठरेल, असं इशांत म्हणाला.

Ishant Sharma | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदलेल्या नियमावर इशांत आणि चहलची नाराजी
Follow us
| Updated on: Jun 12, 2020 | 5:09 PM

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने क्रिकेटच्या नियमांमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार चेंडूची चमक वाढवण्यासाठी खेळाडूंना आता पूर्वीप्रमाणे घाम किंवा थुंकी/लाळ यांचा वापर करता येणार नाही. मात्र याच नियमावरुन भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा  (Ishant Sharma on Saliva Ban) आणि फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yujvendra Chahal) आपली मतं मांडली आहेत.

चेंडूला लाळ न लावण्याचा आयसीसीचा निर्णय चुकीचा असल्याचं  इशांत आणि चहलने म्हटलंय. पाच दिवसीय कसोटी सामन्यादरम्यान वेगवान गोलंदाज स्विंग करण्यासाठी चेंडूला लाळ लावून चमकवतात. जर असं केलं नाही तर चेंडू स्विंग होणार नाही आणि याचा फायदा हा फलंदाजांना होईल, असं इशांत शर्माने (Ishant Sharma) म्हटलं. स्पर्धा समान असावी, असंही तो म्हणाला. (Saliva Ban)

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने काही नवे नियम लागू केले आहेत. त्या नियमांनुसार, खेळाडूंकडून चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर केला जातो. मात्र, चेंडूला थुंकी किंवा लाळ लावल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका आहे. त्यामुळे आयसीसीने डूला थुंकी किंवा लाळ लावल्यास मनाई केली आहे. तसेच, खेळाडूंनी चेंडूला लाळ लावली तर पंचांकडून खेळाडूला दोन वेळा इशारा दिला जाईल. तरीही खेळाडूने नियमांचं उल्लंघन केलं तर जो संघ फलंदाजी करत असेल त्या संघाला पाच धावांची पेनल्टी म्हणजे त्या संघाच्या धावांमध्ये पाच धावा आणखी जोडल्या जातील.

Saliva Ban

चेंडू चमकवणार नाही तर स्विंग होणार नाही : इशांत शर्मा

“जर आम्ही लाल चेंडू चमकवला नाही, तर तो स्विंग होणार नाही. जर स्विंग झाला नाही तर फलंदाजांसाठी ते फायद्याचे ठरेल. माझ्या मते, सामना हा समान असावा. संपूर्ण सामना फलंदाजांच्या बाजूने नसावा”, असं इशांत शर्मा म्हणाला.

चेंडू ड्रिफ्ट झाला नाही तर फलंदाजी करणे सोपं होते : युजवेंद्र चहल

“जेव्हा आपण चेंडू चमकवण्यासाठी लाळेसारख्या नैसर्गिक घटकाचा वापर करतो, तेव्हा वेगवान गोलंदाजाला स्विंग आणि स्पिनर्सला ड्रिफ्ट करण्यासाठी मदत मिळते. जर एक स्पिनर सामन्यादरम्यान चेंडूला ड्रिफ्ट करणार नसेल, तर त्याचा फायदा फलंदाजाला होईल आणि तो सहज फलंदाजी करेल”, असं युजवेंद्र चहल म्हणाला.

“चेंडूला चमकवण्यासाठी स्पिनर्स लाळेचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. आमच्यानंतर जेव्हा विरोधी संघातील वेगवान गोलंदाज बोलिंग करतात, तेव्हा ते सुद्धा हेच करतात. प्रत्येकजण गोलंदाजाच्या मदतीसाठी चेंडूला चमकवण्याचा प्रयत्न करतो. वेगवान गोलंदाजही  अशीच कृती करत असतात”, असंही चहल (Saliva Ban) म्हणाला.

संबंधित बातम्या :

रणजी खेळाडू ‘कोरोना’विरुद्ध मैदानात, 91 क्रिकेटपटूंचे रक्तदान

पाकचा माजी क्रिकेटपटू अब्दुल्ल रझाकचे भारतीय क्रिकेट संघावर गंभीर आरोप

पाक क्रिकेट बोर्डाने बलात्काराचे खोटे आरोप लावून मला संघाबाहेर काढले : शोएब अख्तर

'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं शोले स्टाईलनं आंदोलन; काय आहेत मागण्या?.
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?
मुख्यमंत्री-ठाकरे गटाच्या भेटीगाठी वाढल्या; भाजप दक्ष, ठाकरेंवर लक्ष?.
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'
'मुंडेचा एक क्ल्यू अन् कराडनं पोतं भरून शेतकऱ्यांचे पैसे घेतले'.
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार
निवडणुकीवेळी मायेचा उमाळा, आता 'त्या' बहिणींकडून दंडासह वसुली होणार.
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले
अजित पवार काय पोलीस ऑफिसर आहेत का? शिवतारांचे सवाल अन् दादा भडकले.
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.