पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या पतीला सानिया मिर्झाचं ‘जय हिंद’ने उत्तर

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानमधून भारतात परतले. बॉलिवूड, क्रीडा ते राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांनी अभिनंदनचं स्वागत केलं. तर दुसरीकडे टेनिस स्टार सानिया मिर्झानेही अभिनंदनचं स्वागत केलं. “विंग कमांडर अभिनंदन तुमचं स्वागत आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने आमचे हिरो आहात. तुम्ही जे शौर्य दाखवलंय, त्यासाठी देशाचा तुम्हाला सलाम. जय हिंद.” असं ट्वीट […]

पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या पतीला सानिया मिर्झाचं 'जय हिंद'ने उत्तर
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:22 PM

नवी दिल्ली : भारतीय वायूसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान पाकिस्तानमधून भारतात परतले. बॉलिवूड, क्रीडा ते राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रातील दिग्गजांनी अभिनंदनचं स्वागत केलं. तर दुसरीकडे टेनिस स्टार सानिया मिर्झानेही अभिनंदनचं स्वागत केलं. “विंग कमांडर अभिनंदन तुमचं स्वागत आहे. तुम्ही खऱ्या अर्थाने आमचे हिरो आहात. तुम्ही जे शौर्य दाखवलंय, त्यासाठी देशाचा तुम्हाला सलाम. जय हिंद.” असं ट्वीट सानियाने केलं.

सानिया मिर्झाच्या या ट्वीटनंतर सोशल मीडियावर तिचा पती आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकवर निशाणा साधण्यात आला. अभिनंदन यांना पकडल्यानंतर शोएब मलिकने जे ट्वीट केलं होतं, त्याला सानियाने दिलेलं हे एक प्रकारे उत्तरच होतं. विंग कमांडर अभिनंदन यांना अटक केल्यानंतर शोएब मलिकने पाकिस्तानी वायूसेनेचं कौतुक केलं होतं. पाकिस्तान जिंदाबाद असं ट्वीट त्याने केलं.

शोएब मलिकने जेव्हा हे ट्वीट केलं, तेव्हा यावर सानियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नव्हती. सानियाची प्रतिक्रिया न आल्याने तिच्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करण्यात आली. सानियाचा पती पाकिस्तानी असल्यामुळे ती शांत असल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. पण विंग कमांडर अभिनंदन यांच्या वापसीनंतर सानिया मिर्झानेही त्यांचं जय हिंद म्हणत स्वागत केलं. त्यामुळे सानियाचं कौतुक करण्यात आलं आणि तिने तिच्या पतीलाच हे उत्तर दिलंय असा तर्कही लावण्यात आला.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.