Ranji Final : सौराष्ट्र संघ ठरला 2023 चा रणजी चॅम्पियन, जयदेव उनाडकट ‘मॅन ऑफ द मॅच’

Ranji Final : रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये बंगाल संघाचा पराभव करत सौराष्ट्रने 2023 च्या रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे.

Ranji Final : सौराष्ट्र संघ ठरला 2023 चा रणजी चॅम्पियन, जयदेव उनाडकट 'मॅन ऑफ द मॅच'
Follow us
| Updated on: Feb 19, 2023 | 1:33 PM

कोलकाता : रणजी स्पर्धेच्या फायनलमध्ये बंगाल संघाचा पराभव करत सौराष्ट्रने 2023 च्या रणजी ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. कर्णधार जयदेव उनाडकटच्या नेतृत्त्वाखाली खेळणाऱ्या सौराष्ट्र संघाने गेल्या तीन वर्षात दोनवेळा रणजी स्पर्धा सौराष्ट्रने जिंकली आहे. फायनलमध्ये सौराष्ट्रने बंगालवर 9 विकेट्सने मोठा विजय मिळवला आहे. जयदेव उनाडकटच्या भेदक गोलंदाजीसमोर बंगाल संघाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. एकट्या जयदेवने बंगालच्या दुसऱ्या डावातील 6 विकेट्स घेतल्या. या कामगिरीच्या जोरावर जयदेवला ‘मॅन ऑफ द मॅच’ या पुरस्काराने गौरवण्यात आलं.

फायनलमध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगाल संघाने 174 धावा केल्या होत्या. यामध्ये शाहबाद अहमदने सर्वाधिक 69 आणि अभिषेक पोरलने 50 धावा केल्या होत्या. सौराष्ट्रने त्यांच्या पहिल्या डावात 404 धावाांचा मोठा डोंगर उभा केला. त्यानंतर दुसऱ्या डावातही बंगालला मोठी धावसंख्या उभारण्यात यश आलं नाही. बंगाल संघाचा 241 धावांवर डावातही दुसरा डाव आटोपला यामध्ये जयदेव उनाडकटने सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या. त्यानंतर सौराष्ट्रने 1 गडी गमावत 14 धावांचं लक्ष्य पूर्ण करत 9 विकेट्सने विजय मिळवला.

जयदेव उनाडकटने एकूण आठ विकेट्स घेतल्या आहेत. या कामगिरीसाठी त्याला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आलं. तर मॅन ऑफ द टूर्नामेंट म्हणून अर्पित वसवदा या खेळाडूला गौरवण्यात आलं. रणजी ट्रॉफीच्या इतिहासातील सौराष्ट्र संघाचे हे दुसरे विजेतेपद आहे. जयदेव उनाडकटच्या नेतृत्वाखाली सौराष्ट्रच्या संघाने 2019-20 मध्ये पहिले विजेतेपद पटकावले. गेल्या 11 हंगामांबद्दल बोलायचे झाल्यास, सौराष्ट्र संघाने 5 फायनल खेळल्या आहेत, दोनवेळा जिंकले आणि तीनदा पराभूत झाले होत. गेल्या वर्षीही उपांत्य फेरी गाठण्यात संघाला यश आलं होतं.

दरम्यान, भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्याआधी जयदेव उनाडकटला संघातून रीलीज करण्यात आलं होतं. सौराष्ट्र संघाच्या फायनलसाठी त्याला कसोटी संघातून बीसीसीआयने रीलीज करण्याचा निर्णय घेतला होता. जयदेवनेही या संधीचं सोन करत सौराष्ट्रला फायनल जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.