Sehwag Untold : “मी तिसरं त्रिशतक ठोकलं असतं तर..”, सेहवागने सचिनसोबत केला होती अशी डील
करुण नायरने इंग्लंडविरुद्ध त्रिशतक ठोकण्यापूर्वी हा विरेंद्र सेहवाग हा एकमेव खेळाडू या पंगतीत होता. त्याने हा कारनामा दोनदा केला होता आणि तिसऱ्यांदा ही संधी अवघ्या 7 धावांनी हुकली होती.
मुंबई : विरेंद्र सेहवाग हा पहिला भारतीय खेळाडू आहे ज्याने कसोटीत त्रिशतक ठोकलं आहे. इतकंच काय तर ही कामगिरी त्याने दोनदा केली आहे. त्यानंतर त्रिशतकी खेळी करणारा करुण नायर हा दुसरा भारतीय खेळाडू ठरला. पण विरेंद्र सेहवागच्या आक्रमक त्रिशतकी खेळी कायमच क्रीडाप्रेमींच्या लक्षात राहिली आहे. पहिलं कसोटी त्रिशतक सेहवागने पाकिस्तानविरुद्ध मुलतानमध्ये ठोकलं. त्याने 309 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसरं त्रिशतक दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 2008 मध्ये चेन्नईत ठोकलं. त्यावेली सेहवागने 319 धावा करत दोन त्रिशतकं नावावर केली होती.
सेहवागला तिसऱ्यांदा त्रिशतक करण्याची संधी श्रीलंकेविरुद्ध चालून आली होती. 2009 मध्ये ब्रेबोर्न स्टेडियममध्ये त्याने 254 चेंडूत 293 धावांची खेळी केली. अवघ्या सात धावांनी सेहवागची तिसरं त्रिशतक हुकलं होतं. मात्र बाद होण्यापूर्वी त्याने सचिन तेंडुलकरशी एक डील केली होती. त्याचा खुलासा विरेंद्र सेहवागने 14 वर्षानंतर केला आहे. पण सचिनला त्या डीलबाबत कधीच सांगितलं आहे.
“मी कधी रेकॉर्डसाठी खेळलो नाही. मला काही मिळवण्याचं स्वप्न नव्हतं. पण एक गोष्ट खरी आहे, ती म्हणजे मी तिसरं त्रिशतक करु शकलो नाही. मी 293 धावांवर असताना बाद झालो.”, असं विरेंद्र सेहवागने सांगितलं.
“या खेळीबाबत मी कधीच कुणाशी बोललो नाही. मला कधी बोलावसं वाटलं नाही. पण आज सांगतो. तेव्हा मी त्रिशतकाच्या उंबरठ्यावर होतो. तेव्हा मी सचिनकडे गेलो आणि बोललो की जर मी त्रिशतक केलं तर माझ्यासाठी एक काम करावं लागेल. तेव्हा त्याने सांगितलं काय? जर ते काम मी आता सांगितलं तर त्याचा काय फायदा. तरीही सचिनने त्या मागणीसाठी होकार दिला.”, असं विरेंद्र सेहवागने सांगितलं.
“पण त्या दिवशी ती गोष्ट पूर्ण झाली नाही. मी त्रिशतक करण्यापासून चुकलो. त्यामुळे त्याबाबत मी सचिनला कधीच सांगितलं. ती गोष्ट अपूर्णच राहिली. त्याबाबत आता सांगितलं तर काहीच उपयोग होणार नाही.”, असं विरेंद्र सेहवागने पुढे सांगितलं. त्यानंतर पुढच्या तीन वर्षात विरेंद्र सेहवागने कसोटीत सहा शतकं ठोकली. मात्र कधीच दुहेरी शतकाजवळ पोहोचला नाही. त्यामुळे तिसरं त्रिशतक ठोकण्याचा प्रश्नच आला नाही.
विरेंद्र सेहवाग आतापर्यंत 104 कसोटी सामने खेळला आहे. या कारकिर्दित त्याने त्याने 23 शतकं आणि 32 अर्धशतकं ठोकली आहेत. कसोटीत त्याच्या नावावर 8586 धावा आहेत. 319 हा सर्वात बेस्ट धावसंख्या आहे. विरेंद्र सेहवागने फलंदाजी व्यतिरिक्त 40 गडीही बाद केले आहेत.