“टीम इंडियात स्थान मिळालं तर चांगलंच आहे, नाही मिळालं तर..”, शिखर धवननं स्पष्टच सांगितलं

शिखर धवन गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियाच्या वनडे स्क्वॉडमधून बाहेर आहे. शुभमन गिलचा फॉर्म पाहता आता संघात स्थान मिळणं देखील कठीण झालं आहे. त्यामुळे शिखर धवननं पुनरागमनासाठी काय करणार आहे? याबाबत स्पष्टच सांगितलं आहे.

टीम इंडियात स्थान मिळालं तर चांगलंच आहे, नाही मिळालं तर.., शिखर धवननं स्पष्टच सांगितलं
वनडे टीममधून बाहेर असलेल्या शिखर धवननं स्पष्टच सांगितलं, आता मी...Image Credit source: PTI
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 5:24 PM

मुंबई : रोहित शर्माच्या अनुपस्थितीत एकदिवसीय संघाचं नेतृत्व करणारा शिखर धवन तीन महिन्यांपासून याच फॉर्मेटमधून बाहेर आहे. आता त्याचं भारतीय संघात पुनरागमन करणं देखील कठीण झालं आहे. मात्र संघात पुनरागमन करून वर्ल्डकपमध्ये टीम इंडियात सहभागी होण्याची धवनची इच्छा आहे.धवन मागच्या तीन महिन्यात झालेल्या बांगलादेश, श्रीलंका विरुद्धच्या वनडे सामन्यात संघात नव्हता. या मालिकांमध्ये शुभमन गिलनं चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे रोहित शर्मासोबत सलामीसाठी चांगला खेळाडू हाती लागला आहे.मागच्या वर्षी आयसीसी टी 20 वर्ल्डकप 2022 नंतर केएल राहुल आणि रोहित शर्मा यांना विश्रांती देण्यात आली. या संधीचं सोनं शुभमन गिल याने केलं. सात वनडे सामन्यात 4 शतकं ठोकली. यात एका द्विशतकी खेळीचाही समावेश आहे. त्यामुळे शिखर धवनची संघातील पुनरागमनाची वाट बिकट झाली आहे.

काय म्हणाला शिखर धवन

37 वर्षीय शिखर धवननं पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “आयुष्यात चढ उतार येत असतात. वेळ आणि अनुभवानुसार प्रत्येक जण शिकतो. अशी परिस्थिती आपण कशी हाताळायची शिकतो. मी माझं बेस्ट दिलं आहे. पण माझ्यापेक्षा कोणी चांगलं खेळत असेल तर चांगली गोष्ट आहे. याच कारणामुळे ती व्यक्ती संघात आहे आणि मी तिथे नाही. पण मी जिथे आहे तिथे खूश आहे.”

“संघात पुनरागमनासाठी माझे प्रयत्न सुरुच राहतील. माझ्याकडे पुनरागमन करण्यासाठी चांगला वेळ आहे. जर ठरल्याप्रमाणे झालं तर चांगलं आहे, पण असं झालं नाही तरी मी खूश असेल. मी आतापर्यंत खूप काही मिळवलं आहे आणि मी खूश आहे. जे काही व्हायचं आहे ते होणारच आहे. यासाठी मी हताश होणार नाही.”, असंही शिखर धवननं पुढे सांगितलं.

शिखर धवनची क्रिकेट कारकिर्द

सध्या शिखर धवन भारतीय संघात नाही. मात्र आयपीएलमध्ये त्याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयपीएल 2023 मध्ये शिखर धवन पंजाब किंग्ससाठी कर्णधारपद भूषविताना दिसणार आहे. शिखर धवनने आतापर्यंत 34 कसोटी, 167 एकदिवसीय, 68 टी 20, 122 फर्स्ट क्लास, 302 लिस्ट ए आणि 318 आयपीएल सामने खेळला आहे. कसोटीत शिखर धवननं 7 शतकं आणि 5 अर्धशतकांच्या जोरावर 2315 धावा केल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात 17 शतकं आणि 39 अर्धशतकांच्या जोरावर 6793 धावा केल्या आहेत. आंतराष्ट्रीय टी 20 सामन्यात 11 अर्धशतकांच्या जोरावर 1759 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर आयपीएलमध्ये 2 शतकं आणि 66 अर्धशतकांच्या जोरावर 9272 धावा केल्या आहेत.

काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.