अंपायरचा तो निर्णय आणि 43 दिवसांपूर्वीच्या मॅचमुळे आम्ही स्पर्धेबाहेर, KL राहुलने सांगितली ‘हार की बात’!

आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये चेन्नईने पंजाबचा (Kings XI Punjab) पराभव करत शेवट गोड केला. चेन्नईने केलेल्या पराभवामुळे यंदाच्या मोसमातलं पंजाबचं आव्हान संपुष्टात आलं आहे.

अंपायरचा तो निर्णय आणि 43 दिवसांपूर्वीच्या मॅचमुळे आम्ही स्पर्धेबाहेर, KL राहुलने सांगितली 'हार की बात'!
Follow us
| Updated on: Nov 02, 2020 | 12:13 AM

यूएई : आयपीएल 2020 (IPL 2020) मध्ये चेन्नईने पंजाबचा (Kings XI Punjab) पराभव करत शेवट गोड केला. चेन्नईने केलेल्या पराभवामुळे यंदाच्या मोसमातलं पंजाबचं आव्हान संपुष्टात आलं आहे. 43 दिवसांपूर्वी पार पडलेली दिल्लीविरुद्धची मॅच आमच्या स्पर्धेबाहेर जाण्याला कारणीभूत ठरल्याचं किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार के एल राहुलने (KL Rahul) सांगितलं. (Short run Against Delhi Capital Came back to bite KL Rahul)

चेन्नईविरुद्धची मॅच गमावल्यानंतर के एल राहुलला प्रचंड दु:ख झालं. मॅच गमावताच ते दु:ख त्याच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुफान फॉर्मात असलेल्या पंजाबला स्पर्धेबाहेर जावं लागल्याने के एल राहुलने निशाशा व्यक्त केली.

आजच्या सामन्यात चेन्नईने पंजाबचा 9 विकेट्सने धुव्वा उडवला. यानंतर समारोह सोहळ्यात बोलताना के एल राहुल म्हणाला, “यंदाचा आयपीएलचा मोसम आमच्यासाठी निराशाजनक राहिला. अनेक मॅचमध्ये आम्ही चांगल्या स्थितीत असून देखील मॅचचा रिझल्ट आम्ही आमच्या बाजूने वळवू शकलो नाही. यामध्ये 20 सप्टेंबर रोजीची दिल्लीविरुद्धची लढत आम्हाला खूपच महागात पडली”.

के एल राहुल म्हणाला, “दिल्लीविरुद्धची मॅच सुपर ओव्हरमध्ये जाण्यापूर्वी टीव्ही फुटेजमध्ये स्क्वेअर लेग पंच नितीन मेननने 19 व्या ओव्हरमधील तिसर्‍या बॉलवर ख्रिस जॉर्डनला शॉर्ट रन म्हणून निर्णय दिला तसंच एक रनही कमी केला. टीव्ही रिप्लेवरून हे स्पष्ट होत होते की, जेव्हा त्याने पहिला रन पूर्ण केला तेव्हा जॉर्डनची बॅट क्रीजच्या आत होती. मेनन यांच्या म्हणण्यानुसार, जॉर्डनची बॅट क्रीजच्या आत नव्हती. ज्यामुळे पंजाबच्या रन्समध्ये एकच रन अ‌ॅड झाला. अखेरच्या ओव्हरमध्ये पंजाबला 13 रन्सची गरज होती आणि पंजाबने दिल्लीसमान रन्स करुन मॅच टाय केली. सुपर ओव्हरमध्ये मॅच गेली ज्यामध्ये दिल्लीने विजय मिळविला आणि आम्हाला पराभवाचं तोंड पाहावं लागलं”.

चेन्नईकडून दणदणीत पराभव स्वीकारल्यानंतर राहुल म्हणाला, आज ‘करो या मरो’ची स्थिती असताना आम्ही चांगली बॅटींग केली नाही. आजची मॅच आम्ही दबावात खेळलो. आम्हाला वाटलं होतं की आम्ही 180-190 धावा करु. मात्र दबाव झुगारुन देण्यात आम्हाला यश आलं नाही.

चेन्नईचा शेवट गोड

चेन्नई सुपर किंग्जसने किंग्ज इलेव्हन पंजाबवर 9 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. पंजाबने चेन्नईला विजयासाठी 154 धावांचे आव्हान दिले होते. चेन्नईने हे विजयी आव्हान 9 विकेट्स राखून 18.5 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. ऋतुराज गायकवाड चेन्नईच्या विजयाचा हिरो ठरला. ऋतुराजने 49 चेंडूत नाबाद 62 धावांची नाबाद खेळी केली. ऋतुराजने याखेळीत 6 फोर आणि 1 सिक्स लगावला. तर फॅफ डु प्लेसिसने 34 चेंडूत 4 फोर आणि 2 सिक्ससह 48 धावा केल्या. तर अंबाती रायुडूने नाबाद 30 धावा केल्या. पंजाबकडून ख्रिस जॉर्डनने एकमेव विकेट घेतली.

(Short run Against Delhi Capital Came back to bite KL Rahul)

संबंधित बातम्या

IPL 2020, CSK vs KXIP : ऋतुराज गायकवाडची शानदार खेळी, चेन्नईचा पंजाबवर 9 विकेट्सने दणदणीत विजय

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.