VIDEO | श्रेयस अय्यर कमबॅकसाठी सज्ज, सरावाचे व्हिडीओ शेअर करत दिले संकेत

भारतीय संघातील आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हळू हळू दुखापतीतून सावरत आहे. (Shreyas Iyer Gives Injury Update)

VIDEO | श्रेयस अय्यर कमबॅकसाठी सज्ज, सरावाचे व्हिडीओ शेअर करत दिले संकेत
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 5:47 PM

मुंबई : भारतीय संघातील आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) हळू हळू दुखापतीतून सावरत आहे. टीम इंडियाच्या (Team India) या मधल्या फळीतील फलंदाजाने सोशल मिडीयावर काही व्हिडीओ शेअर केले आहेत. श्रेयस मैदानात उतरण्यासाठी सज्ज होतोय, असं त्या व्हिडीओमधून स्पष्ट होतंय. इंग्लंडविरुद्धच्या व्हाइट बॉल सिरीजदरम्यान त्याच्या खांद्याला दुखापत झाली होती, त्यानंतर गेल्या महिन्यात त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. (Shreyas Iyer Gives Injury Update via Instagram Video, Suryakumar Yadav Appriciates)

शस्त्रक्रियेनंतर त्याने आता आपल्या फिटनेसवर काम सुरू केले आहे. दुखापतीवर मात करत त्याने आता सराव सुरु केला आहे. श्रेयस आता पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज होतोय. त्याने केलेल्या तयारीचा व्हिडीओही त्याने शेअर केला आहे. श्रेयसने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो एका उंच टेकडीवर चढताना दिसतोय, तो वेगाने धावत असल्याचे व्हिडीओत दिसतंय.

View this post on Instagram

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)

सूर्यकुमार यादवकडून कौतुक

अय्यरचा हा व्हिडीओ पाहून त्याचा संघातील सहकारी सूर्यकुमार यादव याने कमेंट केली आहे. सूर्यकुमारने कमेंटमध्ये लिहिलंय ‘ये तो शहंशाहों वाली दौड़ने की तकनीक है.’ (सम्राटांचे रेसिंग तंत्र)

खांदा बरा करण्यासाठी अय्यरचे प्रयत्न

या व्हिडीओशिवाय अय्यरने त्याचा आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो व्यायाम करताना दिसतोय. खांद्यांना तंदुरुस्त ठेवण्यासाठीचे व्यायाम तो सध्या करतोय.

View this post on Instagram

A post shared by Shreyas Iyer (@shreyas41)

फिट झाला तर श्रीलंकेत हिट!

यावर्षी मार्चमध्ये इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात फील्डिंग दरम्यान श्रेयस अय्यरच्या डाव्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमधून तो आता सावरतोय. दरम्यान, या महिन्याच्या शेवटी श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड होणार आहे. जर सर्व काही ठीक राहिले आणि जूलैपर्यंत तो पूर्ण फिट झाला तर बीसीसीआयची निवड समिती त्याच्याकडे दुर्लक्ष करणार नाही. निवड समिती त्याचीदेखील श्रीलंका दौऱ्यासाठी निवड करु शकते.

अय्यरची क्रिकेट कारकीर्द

व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये श्रेयस अय्यरची आतापर्यंतची कामगिरी चांगली राहिली आहे. त्याने आतापर्यंत 22 एकदिवसीय सामन्यांमध्ये 42.8 च्या सरासरीने 813 धावा जमवल्या आहेत. त्यामध्ये एक शतक आणि 8 अर्धशतकांचा समावेश आहे. तर टी-20 क्रिकेटमध्ये त्याने 29 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. यामध्ये 26 डावांमध्ये त्याने 3 अर्धशतकांच्या मदतीने 550 धावा फटकावल्या आहेत.

इतर बातम्या

IPL 2021 चे उर्वरित सामने UAE मध्ये, 29 मे रोजी BCCI घोषणा करणार?

धोनी, विराट आणि रोहितचं एका शब्दात वर्णन, सुर्यकुमार यादवची धमाकेदार उत्तरं!

वयाच्या 32 व्या वर्षापर्यंत 100 शतकं, सगळ्या फॉरमॅटमध्ये 63 हजार रन्स, कुटुंब करत होतं तंबाखूची शेती, तो फलंदाज कोण?

(Shreyas Iyer Gives Injury Update via Instagram Video, Suryakumar Yadav Appriciates)

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.