अश्विनची चलाखी की फसवणूक, बटरलच्या रनआऊटवरुन वाद
IPL 2019 RR vs KXIP जयपूर: आयपीएलमध्ये रोमांचक सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सचा 14 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या 12 वर्षांच्या इतिहासात पंजाबने राजस्थानच्या घरच्या मैदानात त्यांचा पहिल्यांदाच पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने 20 षटकात 4 बाद 184 धावा केल्या. मात्र राजस्थानला 20 षटकात 9 बाद 170 धावांपर्यंतच मजल मारली. या सामन्यात […]
IPL 2019 RR vs KXIP जयपूर: आयपीएलमध्ये रोमांचक सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सचा 14 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या 12 वर्षांच्या इतिहासात पंजाबने राजस्थानच्या घरच्या मैदानात त्यांचा पहिल्यांदाच पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाबने 20 षटकात 4 बाद 184 धावा केल्या. मात्र राजस्थानला 20 षटकात 9 बाद 170 धावांपर्यंतच मजल मारली. या सामन्यात पंजाबच्या विजयापेक्षा त्यांचा कर्णधार आर अश्विनच्या वादग्रस्त वागणुकीची चर्चा गाजत आहे.
राजस्थानची वाटचाला विजयाच्या दिशेने सुरु होती, मात्र जोस बटलरच्या वादग्रस्त रनआऊटमुळे राजस्थानचा पराभव झाला.
अर्धशतक ठोकणाऱ्या जोस बटलरला पंजबचा कर्णधार आर अश्विनने अजबरित्या धावबाद केलं. अश्विन बोलिंगसाठी आला होता, मात्र त्याने बोलिंग टाकण्याची कृती करत, ऐनवेळी चेंडू नॉन-स्ट्राईककडील दांड्यावर मारत, जोस बटलरला धावबाद केलं. अश्विन बॅट्समनच्या दिशेने बॉल टाकणार म्हणून जोस बटरल धाव घेण्यासाठी क्रीजच्या बाहेर आला होता. मात्र अश्विनने त्याला फसवत, धावबाद केलं. तिसऱ्या पंचांनी अर्थात थर्ड अंपायरने मंकड नियमाप्रमाणे जोस बटलरला बाद ठरवलं. मात्र त्यादरम्यान अश्विन आणि बटलरची बाचाबाची झाली.
13 व्या षटकात शेवटच्या चेंडूवर हा सर्व ड्रामा झाला. यावेळी राजस्थानची धावसंख्या 1 बाद 108 अशी होती. मैदानात संजू सॅमसन (12) आणि जोस बटलर 43 चेंडूत 69 धावा करत नॉनस्ट्रायकरला होता. त्यावेळी अश्विनने क्रीज सोडून धाव काढण्यासाठी पुढे गेलेल्या बटलरला समज न देता थेट रनआऊट केलं.
या प्रकारानंतर दिग्गज क्रिकेटपटूंनी सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अशा पद्धतीने समज न देता रनआऊट करणं योग्य नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. हे शालांतर्गत क्रिकेट नाही तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रिकेट आहे, त्यामुळे असं करणं योग्य नाही, असं दिग्गजांनी म्हटलं.
या सामन्यानंतर राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणेही अश्विनच्या वर्तनावर नाराज दिसला. सामना संपल्यानंतर त्यांनी एकमेकांशी हातमिळवणी केली नाही.
#Ashwin is the new Cricket ?? ‘Villain’ ?? on social Media. Atleast declare by some fellow #English and #Australian Cricketers and also by few Indians.
Nw u decide whether he is really wrong ?#RRvsKXIP #AshwinMankads @ICC @BCCI #IPL2019 #JosButtler pic.twitter.com/5yTUfT9XwN
— दिल पे मत ले यार (@kal_Ho_naHo) March 26, 2019
“My actions were within cricket’s rules, can’t be called unsporting.” – @ashwinravi99 responds to accusations of him unfairly running out @josbuttler. #RRvKXIP #VIVOIPL pic.twitter.com/ygOmyGTzCL
— IndianPremierLeague (@IPL) March 25, 2019