Faf Du Plessis| मोठी बातमी: दक्षिण आफ्रिकेच्या फाफ डू प्लेसीचा कसोटी क्रिकेटला अलविदा
दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू फाफ डू प्लेसीनं कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. (Faf Du Plessis retire from test cricket)
नवी दिल्ली: दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर फाफ डु प्लेसी (Faf Du Plessis ) यानं कसोटी क्रिकेटमधून (Test Cricket) निवृत्ती स्वीकारली आहे. डुप्लेसीनं आज (17 फेब्रुवारी) ला त्याबद्दल घोषणा केली. गेल्या काही दिवसांपासून कसोटी क्रिकेटमधील त्याची कामगिरी समाधानकारक राहिली नव्हती. दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तान विरोधातील मालिकेत देखील फाफ डुप्लेसीची कामगिरी चांगली राहिली नव्हती. यामुळे अखेर फाफ डु प्लेसीनं कसोटी क्रिकेटला रामराम करण्याचा करण्याचा निर्णय घेतला. (South Africa Star Cricketer Faf Du Plessis announced retirement from test cricket)
फाफडू प्लेसीची कसोटी कारकीर्द
फाफ डू प्लेसीनं दक्षिण आफ्रिकेचे 69 कसोटी सामन्यात प्रतिनिधीत्व केले आहे. त्यामध्ये त्यानं 4 हजार धावा केल्या आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये फाफ डू प्लेसीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात पदार्पण केले होते. फाफ डू प्लेसीनं कसोटी क्रिकेटमधील शेवटचा सामना पाकिस्तानविरुद्ध रावळपिंडीमध्ये खेळला होता. डू प्लेसीनं दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटीमध्ये 10 शतक केली आहेत.
South African cricketer Faf du Plessis announces his retirement from Test cricket, issues statement on Instagram.
(File photo) pic.twitter.com/VidL2TqoIO
— ANI (@ANI) February 17, 2021
कसोटी क्रिकेटमध्ये खराब फॉर्म
फाफ डू प्लेसी गेल्या काही दिवसांपासून कसोटी क्रिकेटमधील त्याच्या खराब फॉर्ममुळं चिंतीत होता. पाकिस्तान विरोधातील मालिकेत त्याला फक्त 55 धावा करता आल्या होत्या. पाकिस्तान विरोधातील मालिकेत फाफ डू प्लेसीनं दोन कसोटी सामने खेळले. त्यामध्ये अनुक्रमे 10,23,17 आणि 5 धावा त्यानं केल्या. पाकिस्तान विरोधातील मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा 2-0 नं पराभव झाला होता.
Faf du Plessis has announced his retirement from Test cricket.
He played 69 Tests for South Africa scoring 4163 runs at 40.02, including 10 centuries. pic.twitter.com/QfhRjsWqxr
— ICC (@ICC) February 17, 2021
संबंधित बातम्या:
Dale Steyn | नववर्षाच्या सुरुवातीला आफ्रिकेच्या ‘स्टेन गन’ची मोठी घोषणा, आयपीएलमध्ये खेळणार नाही
SA Vs Pak : दक्षिण आफ्रिका 14 वर्षानंतर जाणार पाकिस्तान दौऱ्यावर, जाणून घ्या, कसं असेल शेड्यूल?