Sreesanth | श्रीशांत तब्बल सात वर्षांनी मैदानात उतरण्यास सज्ज, केरळ रणजी संघात निवड
केरळच्या रणजी टीममध्ये श्रीशांतची निवड करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी त्याला फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे.
तिरुवनंतपूरम : स्पॉट फिक्सिंगप्रकरणातील जेलवारीनंतर बंदी (Sreesanth Selected For Kerala Ranji Trophy Team) घालण्यात आलेला वेगवान गोलंदाज एस. श्रीशांत तब्बल सात वर्षांनंतर मैदानात उतरण्यासाठी सज्ज आहे. केरळच्या रणजी टीममध्ये त्याची निवड करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी त्याला फिटनेस सिद्ध करावा लागणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात श्रीशांतवरील सात वर्षांच्या बंदीचा काळ पूर्ण होणार (Sreesanth Selected For Kerala Ranji Trophy Team) आहे.
श्रीशांतला इतक्या वर्षांनी पुन्हा मैदानावर उतरणं तितकंस सोपं नाही. श्रीशांत वयाची 38 वर्षे पूर्ण करणार आहे. त्यामुळे या वयात क्रिकेटच्या मैदानात जो फिटनेस आवश्यक आहे, तो गाठणं तितकंस सोपं नाही.
स्पॉट फिक्सिंग प्रकरणी 2013 मध्ये बंदी
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात IPL 2013 मध्ये स्पॉट फिक्सिंगच्या आरोपाखाली श्रीशांतवर बंदी घालण्यात आली होती. त्याच्यासोबत अजित चंदेला आणि अंकित चव्हाण यांच्यावरही बंदी घालण्यात आली होती.
फिटसेन सिद्ध करुन पुन्हा खेळणार : श्रीशांत
“मी केरळ क्रिकेट असोसिएशनचा आभारी आहे. मी फिटसेन सिद्ध करुन पुन्हा खेळेन. आता सर्व वाद-विवाद विसरण्याची वेळ आली आहे”, अशी प्रतिक्रिया श्रीशांतने दिली (Sreesanth Selected For Kerala Ranji Trophy Team).
केरळ क्रिकेट असोसिएशनची अधिकृत माहिती
केरळ क्रिकेट असोसिएशनने (Kerala Cricket Association) माजी वेगवान गोलंदाज टिनू योहानला संघाचा प्रशिक्षक म्हणून नियुक्त केलं आहे. केरळ क्रिकेट असोसिएशनने श्रीशांतला संघात घेतल्याची अधिकृत माहिती दिली. “श्रीशांत संघासाठी अत्यंत फायद्याचा ठरु शकतो. आम्ही त्याच्या स्वागतासाठी तयार आहोत. तो एक अनुभवी गोलंदाज आहे. फिटनेस सिद्ध करुन तो कॅम्पमध्ये सहभागी होऊ शकतो”, असं असोसिएशनने म्हटलं.
श्रीशांतवरील आजन्म बंदी मागे
2018 मध्ये केरळ उच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने श्रीशांतवरील आजन्म बंदी मागे घेतली. सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये ही बंदी कायम ठेवली होती. मात्र, बीसीसीआयने या बंदीची मर्यादा कमी करण्यास सांगितलं होतं. त्यानंतर श्रीशांतवरील आजन्म बंदीला सात वर्षांवर आणण्यात आलं.
श्रीशांतची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
श्रीशांतने 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वन डे सामन्यातून आंतरराष्ट्रीय करिअरला सुरुवात केली. श्रीशांतने 53 आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. या 53 सामन्यांमध्ये त्याने 75 विकेट्स घेतल्या. त्याशिवाय, 2006 मध्ये त्याने कसोटी सामन्यांमध्ये पदार्पण केलं. त्याने 27 कसोटी सामन्यांमध्ये 87 विकेट्स घेतल्या. श्रीशांत 2007 मध्ये टी-20 विश्व चषक आणि 2011 मधील विश्वचषक जिंकणाऱ्या संघातही होता (Sreesanth Selected For Kerala Ranji Trophy Team).
“बाप बाप होता है” वगैरे घडलंच नाही, सेहवाग खोटारडा : शोएब अख्तर https://t.co/pJh1IHqYL7 #VirenderSehwag @virendersehwag @shoaib100mph #ShoaibAkhtar
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 11, 2020
संबंधित बातम्या :
Ishant Sharma | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बदलेल्या नियमावर इशांत आणि चहलची नाराजी
पाकचा माजी क्रिकेटपटू अब्दुल्ल रझाकचे भारतीय क्रिकेट संघावर गंभीर आरोप
ऑस्ट्रेलियाने रणशिंग फुंकले, बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर