SRH vs DC, IPL 2021 Match 20 Result | सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सची सनरायजर्स हैदराबादवर मात
SRH vs DC 2021 Live Score Marathi : सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने
चेन्नई : सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) मात केली आहे. हैदराबादने दिल्लीला विजयासाठी सुपर ओव्हरमध्ये 8 धावांचे आव्हान दिले होते. हे विजयी आव्हान दिल्लीने सुपर ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर पूर्ण करत विजय साकारला. त्याआधी दिल्लीने हैदराबादला 20 ओव्हरमध्ये 159 धावांवर रोखल्याने सामना बरोबरीत सुटला. हैदराबादकडून केन विलियमसनने सर्वाधिक नाबाद 66 धावा केल्या. तर दिल्लीकडून अवेश खानने 3 अक्षर पटेलने 2 विकेट्स घेतल्या. या सामन्याचे आयोजन चेन्नईतील एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये (MA Chidambaram Stadium Chennai) करण्यात आले होते. (srh vs dc live score ipl 2021 match sunrisers hyderabad vs delhi capitals scorecard online ma chidambaram stadium chennai in marathi)
LIVE Cricket Score & Updates
-
पृथ्वी शॉ ठरला ‘सामनावीर’
दिल्लीचा सलामीवीर पृथ्वी शॉ ला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पृथ्वीने 39 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह 53 धावांची खेळी केली.
-
सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा विजय
सुपर ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादवर मात केली आहे. दिल्लीला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 8 धावांची आवश्यकता होती. या विजयी आव्हानाचे पाठलाग करण्यासाठी दिल्लीकडून शिखर धवन आणि कर्णधार रिषभ पंत खेळायला आले होते. दिल्लीला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर 1 धावेची आवश्यकता होती. दिल्लीने यशस्वीरित्या ही एक धाव काढली. यासह दिल्लीने हैदराबादवर सुपर ओव्हरमध्ये मात केली.
RISHABH'S IN ???
WHAT. A. WIN. #YehHaiNayiDilli #IPL2021 #SRHvDC
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 25, 2021
-
-
रिषभ पंतचा चौकार
रिषभ पंतने सुपर ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावला आहे.
-
हैदराबादकडून राशिद खान बोलिंग करणार
हैदराबादकडून फिरकीपटू राशिद खान बोलिंग करणार आहे.
-
दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात
दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. दिल्लीला सुपर ओव्हरमध्ये विजयासाठी 8 धावांची आवश्यकता आहे. दिल्लीकडून शिखर धवन आणि कर्णधार रिषभ पंत मैदानात आले आहेत.
-
-
हैदराबादकडून दिल्लीला विजयासाठी 8 धावांचे आव्हान
हैदराबादकडून दिल्लीला विजयासाठी सुपर ओव्हरमध्ये 8 धावांचे आव्हान मिळाले आहे. हैदराबादने 6 चेंडूत 7 धावा केल्या.
-
केन विलियमसनचा चौकार
केन विलियमसनने सुपर ओव्हरमधील तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावला आहे.
-
दिल्लीकडून अक्षर पटेल सुपर ओव्हर टाकणार
दिल्लीकडून अक्षर पटेल सुपर ओव्हर टाकत आहे.
-
सुपर ओव्हरमध्ये हैदराबाद प्रथम फलंदाजी करणार
हैदराबाद विरुद्ध दिल्ली सामना टाय झाला आहे. त्यामुळे सुपर ओव्हरमध्ये हैदराबाद प्रथम फलंदाजी करणार आहे. फलंदाजीसाठी हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि केन विलियमसन मैदानात आले आहे.
-
दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना टाय
दिल्ली विरुद्ध हैदराबाद सामना टाय झाला आहे. हैदराबादला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची आवश्यकता होती. मात्र हैदराबादने 1 धावच काढली. त्यामुळे सामना टाय झाला आहे. यामुळ सुपर ओव्हरद्वारे सामन्याचा निकाल लागणार आहे. -
हैदराबादला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची आवश्यकता
हैदराबादला विजयासाठी 1 चेंडूत 2 धावांची आवश्यकता आहे.
-
हैदराबादला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज
हैदराबादला विजयासाठी 6 चेंडूत 16 धावांची गरज आहे. केन विलियमसन आणि जगदीश सूचित मैदानात खेळत आहेत.
-
हैदराबादला सातवा झटका
हैदराबादला सातवा झटका बसला आहे. विजय शंकर 8 धावा करुन आऊट झाला आहे.
-
हैदराबादला विजयासाठी 12 चेंडूत 28 धावांची आवश्यकता
हैदराबादला विजयासाठी 12 चेंडूत 28 धावांची आवश्यकता आहे. केन विलियमन आणि विजय शंकर मैदानात खेळत आहेत.
28 needed from 12 ballsCan Kane do it for #SRH?Can #DC stop Kane?https://t.co/9lEz0r9hZo #SRHvDC #VIVOIPL pic.twitter.com/DthD80Db6R
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2021
-
हैदराबादला सलग 2 धक्के
अक्षर पटेलने हैदराबादला सलग 2 धक्के दिले आहेत. अक्षरने सामन्यातील 17 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर अभिषेक शर्मा आणि दुसऱ्या चेंडूवर राशिद खानला आऊट केलं.
-
हैदराबादला विजयासाठी 50 धावांची आवश्यकता
हैदराबादला विजयासाठी 5 ओव्हरमध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. मैदानात केन विलियमसन आणि अभिषेख शर्मा मैदानात खेळत आहेत.
-
केदार जाधव आऊट
हैदराबादने चौथी विकेट गमावली आहे. विकेटकीपर रिषभ पंतने अमित मिश्राच्या गोलंदाजीवर केदार जाधवला स्टंपिंग आऊट केलं आहे. केदारने 9 धावा केल्या.
-
हैदराबादला तिसरा धक्का
हैदराबादने तिसरी विकेट गमावली आहे. विराट सिंह आऊट झाला आहे. विराटने 4 धावा केल्या.
-
पावर प्लेनंतर हैदराबादचा स्कोअर
पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरनंतर हैदराबादने 2 विकेट्स गमावून 56 धावा केल्या आहेत. हैदराबादला विजयासाठी आणखी 84 चेंडूत 104 धावांची आवश्यकता आहे.
-
हैदराबादला दुसरा झटका
हैदराबादला दुसरा झटका लागला आहे. फटकेबाजी करत असलेला जॉनी बेयरस्टो आऊट झाला आहे. बेयरस्टोने 18 चेंडूत 3 चौकार आणि 4 षटकारांसह 38 धावांची खेळी केली.
-
हैदराबादला पहिला धक्का
हैदराबादला पहिला धक्का बसला आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर रन आऊट झाला आहे. वॉर्नरने 6 धावा केल्या.
-
हैदराबादचा 3 ओव्हरनंतर स्कोअर
हैदराबादने तिसऱ्या ओव्हरमध्ये मार्कस स्टोयनिसच्या गोलंदाजीवर 12 धावा केल्या आहेत. यामध्ये जॉनी बेयरस्टोने एक सिक्स आणि एक फोर लगावला.
-
हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात
हैदराबादच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. हैदराबादला विजयासाठी 160 धावांची आवश्यकता आहे.
-
हैदराबादला विजयासाठी 160 धावांचे आव्हान
दिल्ली कॅपिटल्सने सनरायजर्स हैदराबादने विजयासाठी 160 धावांचे आव्हान दिले आहे. दिल्लीने 20 ओव्हरमध्ये 4 विकेट्स गमावून 159 धावा केल्या. दिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शॉने 53 धावा केल्या. तर कर्णधार रिषभ पंतने 37 धावांची खेळी केली. हैदराबादकडून सिद्दार्थ कौलने 2 विकेट्स घेतल्या.
Innings Break: Prithvi Shaw’s half-century and contributions from middle order guide #DC to 159-4.
Stay tuned for the chase. https://t.co/9lEz0r9hZo #SRHvDC #VIVOIPL pic.twitter.com/AVd8ebr8Yr
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2021
-
दिल्लीला तिसरा झटका
दिल्लीला तिसरा झटका लागला आहे. कर्णधार रिषभ पंत आऊट झाला आहे. पंतने 37 धावा केल्या.
-
दिल्लीचा 18 ओव्हरनंतर स्कोअर
दिल्लीचा 18 ओव्हरनंतर 2 विकेट्स गमावून 142 धावा केल्या आहेत. रिषभ पंत 37 तर स्टीव्ह स्मिथ 21 धावांवर खेळत आहेत.
-
रिषभ पंतचा शानदार सिक्स
रिषभ पंतने सामन्यातील 15 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेेंडूवर सिद्दार्थ कौलच्या गोलंदाजीवर सिक्स लगावला आहे.
-
पंतचा चौकार, दिल्ली 100 पार
रिषभ पंतने सामन्यातील 14 व्या ओव्हरच्या 5 व्या चेंंडूवर राशिद खानच्या गोलंदाजीवर चौकार लगावला. यासह दिल्लीने 100 धावांचा टप्पा ओलांडला आहे.
-
दिल्लीला दुसरा झटका
दिल्लीला दुसरा झटका बसला आहे. पृथ्वी शॉ रन आऊट झाला आहे. पृथ्वीने 53 धावांची शानदार खेळी केली. -
दिल्लीला पहिला धक्का
शानदार सुरुवातीनंतर दिल्लीने पहिली विकेट गमावली आहे. शिखर धवन आऊट झाला आहे. राशिद खानने धवनला बोल्ड केलं. धवनने 28 धावा केल्या.
-
पृथ्वी शॉचे शानदार अर्धशतक
पृथ्वी शॉने शानदार अर्धशतक पूर्ण केलं आहे.पृथ्वीने 35 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आहे. पृथ्वीच्या आयपीएल कारकिर्दीतील 8 वं तर या मोसमातील हे दुसरं अर्धशतक ठरलं.
ROAR Machayenge ft. @PrithviShaw ??#YehHaiNayiDilli #IPL2021 #SRHvDC pic.twitter.com/8ysj4ze2Yl
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 25, 2021
-
‘गब्बर’ धवनचे सलग 2 चौकार
गब्बर शिखर धवनने सामन्यातील 8 व्या ओव्हरधील तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर सलग 2 चौकार लगावले आहेत.
-
दिल्लीचा पावर प्लेनंतर स्कोअर
दिल्ली कॅपिट्ल्सने पावर प्लेच्या पहिल्या 6 ओव्हरमध्ये बिनबाद 51 धावा केल्या आहेत.
51/0 after the powerplay ?
Solid start from Delhi Capitals ??https://t.co/9lEz0r9hZo #SRHvDC #VIVOIPL pic.twitter.com/jPijcpSkcY
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2021
-
दिल्लीच्या सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी
दिल्ली कॅपिट्ल्सची शानदार सुरुवात झाली आहे. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन या सलामी जोडीने अर्धशतकी भागीदारी केली आहे.
-
दिल्लीचा शानदार सुरुवात
दिल्ली कॅपिट्ल्सची शानदार सुरुवात झाली आहे. दिल्लीच्या शिखर धवन आणि पृथ्वी या सलामी जोडीने पहिल्या 4 ओव्हरमध्ये बिनबाद 39 धावा जोडल्या आहेत.
-
दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात
दिल्लीच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. शिखर धवन आणि पृथ्वी शॉ सलामी जोडी मैदानात खेळत आहेत.
-
सनरायजर्स हैदराबादची प्लेइंग इलेव्हन
डेव्हिड वॉर्नर(कर्णधार), जॉनी बेयरस्टो, केन विलियम्सन, विराट सिंह, विजय शंकर, अभिषेक शर्मा, केदार जाधव, राशिद खान, जे सुचित, खलील अहमद आणि सिद्धार्थ कौल.
Match 20. Sunrisers Hyderabad XI: D Warner, J Bairstow, K Williamson, V Singh, K Jadhav, V Shankar, A Sharma, R Khan, J Suchith, S Kaul, K Ahmed https://t.co/hObD85elUx #SRHvDC #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2021
-
दिल्लीची प्लेइंग इलेव्हन
पृथ्वी शॉ, शिखर धवन, स्टीव्ह स्मिथ, रिषभ पंत (कर्णधार), शिमरोन हेटमायर, मार्कस स्टोयनिस, अक्षर पटेल, आर अश्विन, खगिसो रबाडा, अमित मिश्रा आणि अवेश खान.
Match 20. Delhi Capitals XI: P Shaw, S Dhawan, S Smith, R Pant, S Hetmyer, M Stoinis, A Patel, R Ashwin, K Rabada, A Mishra, A Khan https://t.co/hObD84WKvX #SRHvDC #VIVOIPL #IPL2021
— IndianPremierLeague (@IPL) April 25, 2021
-
दिल्लीने टॉस जिंकला
दिल्ली कॅपिट्ल्सने टॉस जिंकला आहे. कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सनरायजर्स हैदराबाद प्रथम गोलंदाजी करणार आहे.
Captain Pant wins the toss and opts to bat first ?
Dilliwalon, how many runs do we need score on the Chennai pitch today? #YehHaiNayiDilli #IPL2021 #SRHvDC
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 25, 2021
Published On - Apr 26,2021 12:01 AM