पाकिस्तानला धूळ चारली ! श्रीलंकेने सलग सहाव्यांदा जिंकली आशिया कप चॅम्पियनशिप

दमदार खेळीने श्रीलंकेने पाकिस्तानचा पराभव केला. फायनमध्ये पोहचलेल्या पाकिस्तानला तब्बल दहा वर्षानंतर आशिया कप जिंकण्याची संधी चालून आली होती. मात्र, श्रीलंकेच्या संघासमोर पाकिस्तानच्या संघाचा टिकाव लागला नाही.

पाकिस्तानला धूळ चारली ! श्रीलंकेने सलग सहाव्यांदा जिंकली आशिया कप चॅम्पियनशिप
आशिया चषक 2022 चे जेतेपद पटकावल्यानंतर श्रीलंका टीमवर पैशांचा पाऊसImage Credit source: twitter
Follow us
| Updated on: Sep 11, 2022 | 11:58 PM

आबूधाबी : पाकिस्तानला धूळ चारत श्रीलंकेने(Sri Lanka) सलग सहाव्यांदा जिंकली आशिया कप चॅम्पियनशिप(Asia Cup championship) जिंकली आहे. पहिला डावात बी राजपक्षाने जे आहे त्याच 71 धावा ठोकून विजयाचा डोंगर उभा केला. आपल्या दमदार खेळीने श्रीलंकेने पाकिस्तानचा(Pakistan) पराभव केला. फायनमध्ये पोहचलेल्या पाकिस्तानला तब्बल दहा वर्षानंतर आशिया कप जिंकण्याची संधी चालून आली होती. मात्र, श्रीलंकेच्या संघासमोर पाकिस्तानच्या संघाचा टिकाव लागला नाही.

रविवारी दुबईच्या स्टेडियममध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्याच्या सुरुवातीपासूनच श्रीलंकेचा संघ आक्रमक खेळी करत होता. श्रीलंकेच्या तगड्या खेळाडूंसमोर पाकिस्तानच्या खेळाडूंचा टिकाव लागला नाही.

पाकिस्तान ने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रीलंकेची सुरुवात किंचीत अडखळत झाली. मात्र, काही क्षणातच या टीमने ग्रीप पकडली. 50 ते 60 धावांच्या दरम्यानच त्यांच्या 5 विकेट्स गेल्या होत्या. पण त्यानंतर भानुका राजपक्ष आणि वणींदू हसरंगा यांनी डाव सावरला. त्यांच्या पार्टनरशीपमुळे श्रीलंकेने विजयी धावांचा डोंगर रचला.

श्रीलंकेने 170 धावा करून 171 धावांच आव्हान पाकिस्तान समोर ठेवलं. त्यात भानुका राजपक्षने तुफानी 71 धावांची तेज तर्रार आणि नाबाद खेळी केली.

पाकिस्तानच्या फलंदाजाना श्रीलंकेच्या गोलंदाजानी सहज तंबूत परत पाठवले. यात वनींदू हसरंगा ने 3 बळी तर मधूशन ने 4 बळी घेतले. 171 धावांचा पाठलाग करत असलेल्या पाकिस्तानला 147 धावांवरच श्रीलंकेने गुंडाळले.

श्रीलंकेने 23 धावांनी हा आशिया कप 2022 चा अंतिम सामना जिंकली आणि पाकिस्तानच्या संघाला चितपट केले. श्रीलंकेने सलग सहाव्यांदा आशिया कप वर आपले नाव कोरले आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.