AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! विनोद कांबळीच्या मदतीला गावस्कर धावले, प्रत्येक महिन्याला आयुष्यभर देणार इतकी रक्कम…

सुनील गावसकर यांच्या CHAMPS फाऊंडेशनने आजारी आणि आर्थिक संकटात सापडलेल्या माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीला आयुष्यभर मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. फाउंडेशन कांबळीला दरमहा 30,000 रुपये आणि दरवर्षी 30,000 रुपये वैद्यकीय खर्चाकरिता देईल. गावसकर आणि कांबळी यांची वानखेडे स्टेडियमवर झालेली भेट आणि कांबळींची बिघडलेली तब्येत ही या निर्णयामागचे कारण आहे.

मोठी बातमी ! विनोद कांबळीच्या मदतीला गावस्कर धावले, प्रत्येक महिन्याला आयुष्यभर देणार इतकी रक्कम...
सुनिल गावस्कर - विनोद कांबळीImage Credit source: social media
| Updated on: Apr 15, 2025 | 1:57 PM
Share

आजारपणामुळे खंगलेल्या आणि आर्थिक विवंचनेत असलेल्या विनोद कांबळीसाठी खुद्द लिटल मास्टर सुनील गावस्कर धावून आले आहेत. सुनील गावस्कर यांच्या CHAMPS फाऊंडेशनच्यावतीने कांबळीला मदत केली जाणार आहे. गावस्कर यांची ही संस्था कांबळीला प्रत्येक महिन्याला 30000 रुपये देणार आहे. विशेष म्हणजे कांबळीला आयुष्यभर ही रक्कम दिली जाणार आहे. ही रक्कम त्याला घर खर्चासाठी दिली जाणार आहे. तसेच त्याचा वैद्यकीय खर्चासाठी वर्षाला आणखी 30000 रुपये दिले जाणार आहेत. वैद्यकीय खर्चाची रक्कमही आयुष्यभरासाठी दिली जाणार आहे. म्हणजे कांबळीला आयुष्यभरासाठी ही मोठी मदत होणार आहे. सुनील गावस्कर यांच्या CHAMPS फाऊंडेशनची सुरुवात 1999मध्ये झाली होती. गरजवंत क्रिकेटपटूंना मदत करणे हा या फाऊंडेशनचा हेतू होता.

विनोद कांबळीला दर महिन्याला 30 हजार रुपये देण्यात येणार आहे. 1 एप्रिलपासूनच ते दिले जाणार आहेत. म्हणजे पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही रक्कम दिली जाणार आहे. 53 वर्षीय विनोद कांबळी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्य्तं त्याला हे पैसे देण्यात येणार आहेत. याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

जानेवारीत भेट, एप्रिलमध्ये मदत

11 जानेवारी रोजी वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी विनोद कांबळी आणि सुनील गावस्कर यांची भेट झाली होती. यावेळी कांबळीने गावस्कर यांच्या पायाला हात लावून दर्शन घेतलं होतं. त्यावेळी कांबळी अत्यंत भावूक झाला होता. त्या भेटीनंतर आता गावस्कर यांच्या संस्थेने हा मोठा निर्णय घेतला आहे. अवघ्या तीन महिन्यातच हा निर्णय घेण्यात आला आहे.

प्रकृती ढासळल्याने निर्णय

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विनोद कांबळीची प्रकृती खूपच खालावली होती. त्याला यूरिन इन्फेक्शन झालं होतं. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कांबळीची तब्येत बिघडल्याचं ऐकल्यानंतर गावस्कर यांनी त्याला मदत करण्याची इच्छा व्यक्त केली होती. वानखेडे स्टेडियमवर दोघांचीही भेट झाली होती. त्यानंतर गावस्कर यांनी कांबळीच्या दोन्ही डॉक्टरांची भेट घेतली होती. त्यानंतर त्याला मदत करण्याचा गावस्कर यांनी निर्णय घेतला.

मदत मिळणारा कांबळी दुसरा

सुनील गावस्कर यांच्या CHAMPS फाऊंडेशनकडून खेळाडूंना मदत केली जाते. आता या फाऊंडेशनकडून मदत घेणारा कांबळी हा दुसरा क्रिकेटपटू आहे. याआधी माजी क्रिकेटपटू सलीम दुर्रानी यांना गावस्कर यांच्या फाऊंडेशनने मदत केली होती.

नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा
BMC साठी महायुतीची पहिली बैठक, पहिल्या फेरीत 142 जागांवर तोडगा.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.