धोनीचा ‘वर्ल्डकप विनिंग’ सिक्सर झेलणारा क्रिकेट रसिक सापडला, गावस्करांमुळे नऊ वर्षांनी शोध
श्रीलंका संघाच्या 274 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 49 व्या षटकात त्यावेळचा भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनीने मारलेला सिक्सर सामना आणि पर्यायाने वर्ल्डकप जिंकवून देणारा ठरला.
मुंबई : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने 2011 च्या विश्वचषकात वानखेडे स्टेडियमध्ये मारलेला ऐतिहासिक षटकार ‘माही’चे चाहते विसरणार नाहीत. ‘कॅप्टन कूल’चा तो ‘वर्ल्डकप विनिंग’ षटकार झेललेल्या क्रिकेट रसिकाचा तब्बल नऊ वर्षांनी शोध लागला. याचं श्रेय जातं भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांना. (Sunil Gavaskar helps MCA Find Cricket fan who caught MS Dhoni’s World Cup 2011 winning sixer)
तो दिवस होता 2 एप्रिल 2011 चा. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका क्रिकेट विश्वचषकाचा अंतिम सामना होता. श्रीलंका संघाच्या 274 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 49 व्या षटकात त्यावेळचा भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनीने मारलेला सिक्सर सामना आणि पर्यायाने वर्ल्डकप जिंकवून देणारा ठरला.
धोनीच्या सिक्सरनंतर देशभरात एकच जल्लोष झाला आणि तो चेंडू षटकार झेलणाऱ्या चाहत्यासाठी स्पेशल गिफ्ट ठरला. वानखेडे स्टेडियममधील एमसीए पॅव्हिलियन L ब्लॉकमधील सीट क्रमांक 210 ही ती जागा.
धोनीने षटकार ज्या जागेवर मारला ते आसन कायमस्वरुपी धोनीच्या नावाने ओळखले जाईल, अशा पद्धतीने सुशोभित करण्यात यावे, अशी मागणी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी अजिंक्य नाईक यांनी केली होती. तसंच तो ऐतिहासिक चेंडू जतन करावा, असेही अजिंक्य नाईक यांनी सुचवले होते. धोनीने 15 ऑगस्टला आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीचा यथोचित सन्मान करण्यासाठी अजिंक्य नाईक यांनी हा प्रस्ताव एमसीए कमिटीच्या बैठकीत मांडला होता.
नाईक यांनी मांडलेली संकल्पना सुनील गावस्कर यांना आवडली होती. ऐतिहासिक षटकाराचा चेंडू जिथे पडला, ती जागा आणि तो चेंडू शोधण्यासाठी सुनील गावस्कर यांनी पुढाकार घेतला. ऐतिहासिक षटकार झेलणारा हा क्रिकेट रसिक सुनील गावस्कर यांच्या ओळखीचा आहे. सध्या हाँगकाँगमध्ये निवासी असलेल्या या रसिकाकडेच तो चेंडू आहे. (Sunil Gavaskar helps MCA Find Cricket fan who caught MS Dhoni’s World Cup 2011 winning sixer)
ऐतिहासिक षटकाराची ती जागा नेमकी कोणती आहे तसंच तो क्रिकेट रसिक आपल्या ओळखीचा असल्याचे गावस्कर यांनी अजिंक्य नाईक यांना अलीकडेच एका ईमेलद्वारे कळवले आहे. एमसीएची अपेक्स कौन्सिल आणि म्युझियम कमिटी याबाबत पुढील पाठपुरावा करणार आहे. एमसीएमध्ये विश्वचषक सामन्याच्या आठवणी जपणारे म्युझियम शोकेस असेल, असे मुंबई क्रिकेट असोसिएशनने आधीच स्पष्ट केले आहे.
We at the Tourism Dept had requested @MumbaiCricAssoc to work with us on opening up of Wankhede Stadium for a stadium experience tour to tourists and fans from around the world. They have agreed in principle to work together on the same. (1/n)
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 22, 2020
संबंधित बातम्या :
IPL 2020 : सलामीच्या सामन्याचा विक्रम, मैदानात प्रेक्षक नाहीत, तरीही सामना पाहणाऱ्यांचा नवा रेकॉर्ड
(Sunil Gavaskar helps MCA Find Cricket fan who caught MS Dhoni’s World Cup 2011 winning sixer)