IPL 2020 : सनरायजर्स हैदराबादला मोठा धक्का, दुखापतीमुळे मिचेल मार्श स्पर्धेबाहेर
मिचेल मार्शच्या जागेवर संघात जेसन होल्डरला स्थान दिले आहे. | Mitchell Marsh Out To IPL 2020
दुबई : आयपीएलच्या 13 व्या मोसमाला सुरुवात झाली आहे. सनरायजर्स हैदराबादची (Sunrisers Hyderabad) या मोसमातील सुरुवात पराभवाने झाली. यानंतर आता हैदराबादसाठी एक वाईट बातमी आली आहे. हैदराबादला एक मोठा धक्का लागला आहे. दुखापतीमुळे हैदराबादच्या अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शला ( Mitchell Marsh ) स्पर्धेतून बाहेर पडावं लागलं आहे. याबाबतची माहिती हैदराबादने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. ( Mitchell Marsh Out To IPL 2020 )
? Official Statement ?
Mitchell Marsh has been ruled out due to injury. We wish him a speedy recovery. Jason Holder will replace him for #Dream11IPL 2020 .#OrangeArmy #KeepRising
— SunRisers Hyderabad (@SunRisers) September 23, 2020
ट्विटमध्ये काय म्हटलंय ?
मिचेल मार्श दुखापतीमुळे आयपीएल स्पर्धेतून बाहेर पडला आहे. मार्श लवकरात लवकर या दुखापतीतून बाहेर पडो, अशी आम्ही आशा करतो . हैदराबादमध्ये मार्शच्या जागेवर वेस्ट इंडिजचा कसोटी कर्णधार जेसन होल्डरचा (Jason Holder) समावेश करण्यात आला आहे.
नक्की काय घडलं ?
सोमवारी 21 सप्टेंबरला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना खेळण्यात आला. या सामन्यादरम्यान मिचेल मार्श आपल्या स्पेलमधील पहिली ओव्हर टाकायला आला. ओव्हरमधील दुसऱ्या बॉलवर अॅरान फिंचने मारलेला ड्राईव्ह शॉट रोखण्याचा प्रयत्न मार्शने केला. या प्रयत्नात मार्शच्या पायाच्या टाचेला दुखापत झाली. यानंतर त्याने आणखी दोन बॉल फेकले. मात्र यानंतर आणखी तीव्रतेने त्रास जाणवल्याने मार्शने मैदान सोडले. यानंतर बॅटिंगसाठी मार्श दहाव्या क्रमांकावर खेळायला आला. मात्र मार्श पहिल्याच बॉलवर बाद झाला.
A true warrior! ?#OrangeArmy #SRH #Dream11IPL pic.twitter.com/IfLLwYHXWT
— SunRisers Hyderabad (@SunRisers) September 22, 2020
जेसन होल्डरचे 3 वर्षानंतर पुनरागमन
मिचेल मार्शला दुखापतीमुळे संघातून बाहेर पडावे लागले आहे. त्यामुळे मार्श ऐवजी जेसन होल्डरला ( jason holder ) स्थान दिले आहे. यासह तब्बल 3 वर्षानंतर होल्डरने आयपीएलमध्ये पुनरागमन केलं आहे. याआधी होल्डरने आयपीएलमधील अखेरचा सामना 2016 मध्ये खेळला होता.
Caribbean in the Arabian ?
Welcome back in ?, @Jaseholder98!#OrangeArmy #KeepRising #Dream11IPL #IPL2020 pic.twitter.com/MJou9vP6aE
— SunRisers Hyderabad (@SunRisers) September 23, 2020
संबंधित बातम्या :
Sanju Samson : परफेक्ट टाईम, धडाकेबाज बॅटिंग, संजू सॅमसनचा झंझावात
धोनीचा ‘वर्ल्डकप विनिंग’ सिक्सर झेलणारा क्रिकेट रसिक सापडला, गावस्करांमुळे नऊ वर्षांनी शोध
( Mitchell Marsh Out To IPL 2020 )